नवीन नांदेडात रस्ते खोदण्याचा सपाटा रस्त्यावरुन चालताना: अबालवृद्धांना त्रास

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:26+5:302015-02-18T00:13:26+5:30

नांदेड: वारंवार पुरावा केल्यानंतर सिडकोतील रस्त्यांची नेमकीच डागडुजी करण्यात आली़ जलवाहिनी टाकण्यासाठी हे रस्ते पुन्हा खोदण्यात येत असल्याने येथील रहिवाशांच्या समस्येत आणखी भर पडली आहे़

The new Nanded road is excavated while walking through the streets | नवीन नांदेडात रस्ते खोदण्याचा सपाटा रस्त्यावरुन चालताना: अबालवृद्धांना त्रास

नवीन नांदेडात रस्ते खोदण्याचा सपाटा रस्त्यावरुन चालताना: अबालवृद्धांना त्रास

ंदेड: वारंवार पुरावा केल्यानंतर सिडकोतील रस्त्यांची नेमकीच डागडुजी करण्यात आली़ जलवाहिनी टाकण्यासाठी हे रस्ते पुन्हा खोदण्यात येत असल्याने येथील रहिवाशांच्या समस्येत आणखी भर पडली आहे़
महापालिकेचा भाग असला तरी नवीन नांदेड भागात मुलभूत सुविधांची पूर्वीपासूनच वाणवा आहे़ अरुंद रस्ते, ड्रेनेजलाईनचा अभाव, पथदीवे आदी समस्या कायम आहेत़ वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या भागातील काही रस्ते नव्याने तयार करण्यात आले तर काहींची डागडुजी करण्यात आली़ विकासकामे करताना प्राधान्यक्रम ठरविला जातो़ मात्र या भागाच्या बाबतीत त्याचा विसर सबंधितांना पडल्याचे दिसून येते़ लाखो रुपये खर्चून नुकतेच तयार केलेले रस्ते केबल व जलवाहिनी टाकण्यासाठी खोदण्याचे काम गत दोन महिन्यांपासून सुरु आहे़ एऩडी़ २ भागातील हनुमान मंदिर ते सिडको मुख्य रस्ता यासह अंतर्गत रस्ते खोदून ठेवले आहेत़ काम पूर्ण झाल्यावर डागडुजी न केल्याने काळ्या मातीचे ढिगारे अनेक जागी पहावयास मिळतात़ येथून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ विशेषत: लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना याचा त्रास होत आहे़ जलवाहिनी टाकण्यासाठी अखंड पाईप न वापरता तुकड्यांना जोडणी दिली जात असल्याने भविष्यात पाणीगळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ सदरील कामाचा दर्जा राखला जावा़ त्याबरोबरच खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी येथील रहिवाशांतून होत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The new Nanded road is excavated while walking through the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.