शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत नवे राज्यपाल? PM मोदींनी बोलावली मंत्रिमंडळ बैठक; मोठा फेरबदल शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 06:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ७५ सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक ३१ जानेवारीच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या आठवड्याच्या अखेरीस बोलावली आहे.

हरिश गुप्तानवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ७५ सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक ३१ जानेवारीच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या आठवड्याच्या अखेरीस बोलावली आहे. मोठ्या फेरबदलापूर्वी ही विद्यमान मंत्रिमंडळाची अखेरची बैठक असू शकते, अशी साऊथ ब्लॉकमध्ये चर्चा आहे. अनेक राज्यांत नवीन राज्यपाल व उपराज्यपालांच्या नियुक्त्या व भाजपमधील बदल एकाचवेळी होऊ शकतात, असे समजते.

सूत्रांनी सांगितले की, टीम-मोदीमध्ये २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा फेरबदल होऊ घातला असून, त्याबाबत सहकारी मंत्र्यांना खडे बोल सुनावण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. मोदी आपल्या वॉर-टीमला अंतिम स्वरूप देत असून, कमी कार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो.

मंत्रिमंडळाच्या या बैठकीच्या अजेंड्याबाबत कोणालाही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, तुमच्या कार्यक्षमतेवर बारीक नजर ठेवली जात आहे, असे मोदींनी मंत्र्यांना काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. या बैठकीत त्यांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्र्यांमध्ये सध्या अस्वस्थता आहे.

कमजोर असलेल्या जागांची संख्या वाढलीभाजपने एक सर्वेक्षण केलेले असून, त्यात पक्ष कमजोर असलेल्या लोकसभेच्या जागांची संख्या १४४ वरून १७० गेल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ व आणखी काही महत्त्वाच्या राज्यांतील ही स्थिती आहे. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री सध्या भाजपचे उपाध्यक्ष असून, त्यांना प्रजासत्ताक दिनी पक्ष मुख्यालयात तिरंगा फडकावण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. यावरून सर्व काही स्पष्ट होते.

राज्यात कोण येणार; १५ दिवसांत ठरणार?महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्यानंतर आता नवीन राज्यपाल कोण येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या १५ दिवसांत नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राजस्थान भाजपमधील वजनदार नेते ओम माथुर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, राज्यसभा सदस्य राहिलेले मध्य प्रदेशातील भाजपचे नेते प्रभात झा, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची नावे चर्चेत आहेत. माथूर हे २०१४च्या निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचे प्रभारी राहिले आहेत. राज्यातील भाजपच्या नेत्यांशी त्यांचे स्रेहपूर्ण संबंध आहेत. सुमित्रा महाजन मध्य प्रदेशातील असल्या तरी मराठी आहेत आणि त्यांचे माहेर मुंबई आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेले अमरिंदरसिंग हे भाजपचे पंजाबमधील नेते आहेत.लोकसभा, विधानसभा निवडणूक दीड-दोन वर्षांवर असताना भाजप परिवारातील व्यक्तीची आणि त्यातही महाराष्ट्राची माहिती असलेल्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून संधी दिली जाऊ शकते. राज्यात कोण येणार? याची चर्चा आता रंगली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी