शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील उपचाराधीन कोरोना बाधितांचा आकडा २ लाखांहून कमी, मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:54 IST

देशात कोरोनाचे १,०६,१०,८८३ रुग्ण आहेत. त्यातील १,०२,६५,७०६ बरे झाले व १,५२,८६९ जणांचा बळी गेला. गुरुवारी कोरोनाचे १५,२२३ नवे रुग्ण आढळले व १९,९६५ जण बरे झाले.

नवी दिल्ली : देशात कोरोना बळींच्या दररोजच्या संख्येतही मोठी घट झाली असून, गुरुवारी या संसर्गामुळे १५१ जणांचा बळी गेला. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी २ लाखांवर पोहोचली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी आहे.देशात कोरोनाचे १,०६,१०,८८३ रुग्ण आहेत. त्यातील १,०२,६५,७०६ बरे झाले व १,५२,८६९ जणांचा बळी गेला. गुरुवारी कोरोनाचे १५,२२३ नवे रुग्ण आढळले व १९,९६५ जण बरे झाले. कोरोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण ९६.७५ टक्के झाले आहे, तर मृत्यूदर १.४४ टक्के आहे. सध्या १,९२,३०८ उपचाराधीन रुग्ण असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १.८१ टक्के आहे. जगामध्ये ९ कोटी ७३ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ६ कोटी ९८ लाख कोरोना रुग्ण बरे झाले.मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार कोरोना लस -- देशातील कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत प्रथम ही लस घेण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे कळते. देशामध्ये १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. - कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर काही दिवसांतच लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य सेवक, कोरोना योद्धे यांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. त्याचा सर्व खर्च केंद्र सरकार करत आहे.- लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ५० वर्षे वयावरील व्यक्ती तसेच गंभीर स्वरूपाच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या ५० वर्षे वयाखालील व्यक्ती यांना प्राधान्याने लस देण्यात येईल. या व्यक्तींमध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. कोरोना लस घेण्याबाबत अनेक लोक संभ्रमावस्थेत आहेत. लस घेऊनही इस्रायलमध्ये १२४०० लोकांना कोरोना -फायझर कंपनीने बनविलेली लस घेतल्यानंतरही इस्रायलमध्ये १२,४०० लोक कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील ६९ लोकांनी तर या लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तरी त्यांना या संसर्गाची बाधा झाली. फायझरची लस दिलेल्या १८९००० जणांची इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने तपासणी केली असता ६.६ टक्के लोक कोरोनाग्रस्त आढळले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल