नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:47 IST2025-11-12T06:46:50+5:302025-11-12T06:47:06+5:30
Air Pollution In Delhi: देशाची राजधानी नवी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या हंगामातील हवेची गुणवत्ता सर्वांत वाईट झाल्याने दिल्लीची अवस्था एखाद्या गॅस चेंबरसारखी झाली आहे.

नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
नवी दिल्ली - देशाची राजधानी नवी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या हंगामातील हवेची गुणवत्ता सर्वांत वाईट झाल्याने दिल्लीची अवस्था एखाद्या गॅस चेंबरसारखी झाली आहे. मंगळवारी दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४२३ म्हणजे अत्यंत गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आला. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्राने अनावश्यक बांधकाम, दगड फोडण्याची यंत्रे व खाणकामांवर बंदी यासारख्या उपयायोजना केल्या आहेत.
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी जारी केलेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार एक्यूआय अत्यंत खराब श्रेणीत म्हणजे ३६२ नोंदवण्यात आला. मंगळवारी सकाळी प्रदूषणात भर पडल्याने एक्यूआय ४२३ नोंदवण्यात आला.
- दिवाळीनंतर दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने खराब किंवा अत्यंत खराब नोंदवण्यात येत आहे. प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत असल्याने त्यात भरच पडत आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
पंजाब व हरियाणात शेतकरी मोठ्या प्रमाणावर पेंढा जाळत असल्याने दिल्ली-एनसीआरमधील हवेचा दर्जा खालावत असल्याची माहिती मंगळवारी सर्वोच्च न्यायालयास देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.