शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आता ग्राहक होणार पॉवरफुल्ल; मोदी सरकार 20 जुलैला नवा कायदा लागू करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:26 IST

ग्राहक संरक्षण कायदा -2019  (Consumer Protection Act-2019)ला 20 जुलैपासून लागू केले जाणार आहे.

नवी दिल्लीः ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी मोदी सरकार नवा कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे. ग्राहक संरक्षण कायदा -2019  (Consumer Protection Act-2019)ला 20 जुलैपासून लागू केले जाणार आहे. नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986चं स्वरूप आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी ही माहिती दिली आहे. मोदी सरकार येत्या सोमवारी 20 जुलै रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा -2019 (Consumer Protection Act-2019) लागू करणार आहे. या नवीन कायद्याची अंमलबजावणी होताच जुन्या कायद्यात नसलेल्या ग्राहकांच्या हिताचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत.नवीन कायद्याची ही आहेत वैशिष्ट्ये 

  • नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना दिशाभूल करणार्‍या जाहिराती दाखवल्यास कारवाई केली जाणार आहे.
  • ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात गुन्हा दाखल करू शकतो
  • ऑनलाइन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा प्रथमच नव्या कायद्यात समावेश होणार आहे
  • खाण्या-पिण्यातील भेसळ करणार्‍या कंपन्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूद
  • ग्राहक मेडिएशन सेलची स्थापना, दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने मेडिएशन सेलमध्ये जाऊ शकतील
  • पीआयएल म्हणजे याचिका आता ग्राहक मंचामध्ये दाखल करता येणार आहे. आधीच्या कायद्यात तशी तरतूद नव्हती
  • ग्राहक मंचामध्ये सुमारे एक कोटी खटले दाखल करता येणार आहेत
  • राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग एक कोटी ते दहा कोटीपर्यंतच्या प्रकरणांची सुनावणी करेल.
  • राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात दहा कोटींपेक्षा जास्त प्रकरणांची सुनावणी 

संरक्षण कायदा 2019 खूप आधी तयार करण्यात आला आहे. हा कायदा काही महिन्यांपूर्वीच लागू होणार होता, परंतु कोरोना महारोगराईचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे कायद्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता हा नवीन कायदा पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे. 

हेही वाचा

बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी 

धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा

देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्‍या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

मोठी बातमी! 'या' बँकांनी मिनिमम बॅलन्स अन् व्यवहाराचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा बसेल फटका

जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात.... 

ट्विटर हॅकर्स मागणी करणारे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजे नेमकं काय?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीconsumerग्राहक