व्येश्याव्यवसाय 'कूल प्रोफेशन', स्टँडअप कॉमेडियनवर नेटकऱ्यांचा संताप; काढले संस्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 21:18 IST2023-10-23T21:16:43+5:302023-10-23T21:18:58+5:30

सँडअप कॉमेडियन विदुषी स्वरुपने व्येशाव्यवसायावर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Netizens rage over stand up comedian vidushi swaroops remark on prostitution | व्येश्याव्यवसाय 'कूल प्रोफेशन', स्टँडअप कॉमेडियनवर नेटकऱ्यांचा संताप; काढले संस्कार...

व्येश्याव्यवसाय 'कूल प्रोफेशन', स्टँडअप कॉमेडियनवर नेटकऱ्यांचा संताप; काढले संस्कार...

Standup Comedy: कॉमेडी करणे सोपी गोष्ट नाही, स्टँडअप कॉमेडी तर मुळीच नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक स्टँडअप कॉमेडियन वादात अडकले आहेत. यातील काहींनी धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले, तर कुणी नेत्यांवर थेट टीका केली. आता या यादीत आणखी एका स्टँडअप कॉमेडियनचे नाव आले आहे. विदुषी स्वरुप, असे या तरुणीचे नाव असून, तिने व्येश्याव्यवसायासारख्या संवेदनशील विषयावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

स्टँडअप कॉमेडियन विदुषी स्वरुपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विदुषीने वेश्याव्यवसायाला 'कूल प्रोफेशन' म्हटले. विदुषीने वेश्याव्यवसायाची इतर व्यवसायांशी तुलना केली आहे आणि अशा अनेक गोष्टी बोलल्या, ज्यानंतर वाद निर्माण झाला आहे. 

विदुषी म्हणते, 'मला वेश्याव्यवसाय कुल वाटतो. वेश्याव्यवसायात अनुभवाबाबत कोणताही भेदभाव होत नाही. या प्रोफेशनमध्ये फ्रेशर्स हवे असतात, त्यांच्यासाठी ऑर्डर दिली जाते. वेश्याव्यवसाय हा एकमेव व्यवसाय आहे, जिथे इंटर्न सीईओपेक्षा जास्त कमाई करतात. वेश्या शेख लोकांसोबत दुबईला फिरायला जातात', असे वक्तव्य तिने केले.

एवढ्या मोठ्या आणि संवेदनशील मुद्द्यावर एक महिला म्हणून विदुषी असे बोलू शकते, यावर अनेकांना विश्वास बसत नाहीये. तिच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी तिचा व्हिडिओ शेअर करत टीका केली, तिच्या आई-वडिलांचे संस्कारही काढले. 

Web Title: Netizens rage over stand up comedian vidushi swaroops remark on prostitution