शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्येही घराणेशाही, केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला पाठवले पुरावे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 11:10 AM

राजकारणामध्ये असलेली घराणेशाही आता भारतीयांच्या अंगवळणी पडली आहे. आता मात्र न्यायव्यवस्थेमध्येही घराणेशाही निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली - राजकारणामध्ये असलेली घराणेशाही आता भारतीयांच्या अंगवळणी पडली आहे. आता मात्र न्यायव्यवस्थेमध्येही घराणेशाही निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये घराणेशाही होत असल्याचे पुरावे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या कलिजियमला पाठवले आहेत. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पाठवण्यात आलेली नावे आणि निवृत्त न्यायाधीशांशी असलेला त्यांच्या संबंधाचा उल्लेख करत केंद्र सरकारने ही माहिती पाठवली आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या कलीजियमकडून पाठवण्यात आलेल्या 33 नावांपैकी 11 वकिलांचे आणि माजी न्यायमूर्तींचे नातेसंबंध असल्याचा यात उल्लेख आहे. केंद्र सरकारने अलाहाबाद हायकोर्टाच्या कलीजियमकडून फेब्रुवारीमध्ये पाठवण्यात आलेल्या 33 वकिलांची यादी आपल्या माहितीसह सर्वोच्च न्यायालयाच्या कलीजियमला सोपवली आहे. केंद्र सरकारने वकिलांची पात्रता वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रामाणिकपणा यांसही न्यायव्यवस्थेमधील त्यांची प्रतिमा आदिंबाबतच्या निष्कर्षांची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या कलीजियमला दिली आहे.  तसेच सरकारने कार्यरत असलेले न्यायाधीश आणि निवृत्त न्यायाधीश यांच्यासोबत इच्छुक उमेदवारांच्या असलेल्या संबंधांनाही आपल्या निष्कर्षांमध्ये सामील करण्यात आले आहे. केंद्र सरकारने कर्तबागर वकिलांनाही योग्य संधी मिळण्याबाबत पाठपुरावा करताना सर्वोच्च न्यायालयाच्या कलीजियमला न्यायव्यवस्थेतील घराणेशाहीची व्यापक माहिती पुरवली आहे. अलाहाबाद हायकोर्टाने दोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने शिफारस पाठवली होती. त्यावेळी हायकोर्टाच्या कलीजियमने 30 वकिलांच्या नावाची न्यायाधीशपदासाठी शिफारस केली होती. मात्र तेव्हाचे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी यापैकी 11 वकिलांची नावे फेटाळत केवळ 19 जणांच्या नावांची हायकोर्टाचे वकील म्हणून शिफारस केली होती. 2016 च्या यादीमध्येसुद्धा न्यायाधीश आणि नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांची नावे होती.  यावेळीसुद्धा पाठवण्यात आलेल्या 33 नावांपैकी 11 ते 12 जण न्यायाधीश बनण्याच्या योग्यतेचे असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. तसेच अलाहाबाद हायकोर्टाच्या कलीजियमने फेब्रुवारी महिन्यात पाठवलेल्या या यादीत एससी-एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समुदायाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. तसेच निवडण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये उच्च जातीच्या उमेदरावांचे आणि एका विशिष्ट्य जातीच्या उमेदवारांचे प्रतिनिधित्व अधिक आहे. केंद्र सरकारकडून या बाबीवरही बोट ठेवण्यात आले आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार