धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 09:45 IST2020-05-19T09:42:19+5:302020-05-19T09:45:20+5:30
नेपाळनं या रस्त्यावरून वाद निर्माण केला नव्हता. पण नेपाळ चीनच्या इशाऱ्यावरून नव्या रस्त्याला विरोध करत असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'
नवी दिल्लीः कैलास मानसरोवरपर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारत उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये चीन-नेपाळ सीमेजवळील लिपुलेख पासपासून ५ किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. त्यालाच आता चीननं आक्षेप नोंदवला आहे. विशेष म्हणजे याआधी कधीही नेपाळनं या रस्त्यावरून वाद निर्माण केला नव्हता. पण नेपाळ चीनच्या इशाऱ्यावरून नव्या रस्त्याला विरोध करत असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेपाळनं आपला नवीन नकाशा तयार केला असून, भारतीय सीमेतील कमीत कमी तीन क्षेत्रांचा त्यात समावेश दाखवण्यात आला आहे. सोमवारी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नकाशाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हे तीन भाग नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत, पण हे भाग भारताच्या हद्दीत आहेत.
नेपाळ तो भाग परत घेण्याचा प्रयत्न करेल
नेपाळच्या मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर नेपाळचे अध्यक्ष विद्यादेवी भंडारी म्हणाले, “लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी भाग नेपाळमध्ये येतात आणि हे क्षेत्र पुन्हा मिळविण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जातील. त्यामुळेच नेपाळचा अधिकृत नकाशा जाहीर केला गेला आहे.
दरम्यान, जागतिक राजकारणाच्या नाड्या आपल्या हाती राहाव्यात म्हणून आक्रमकतेच्या सर्व सीमा ओलांडणा-या चीनसारख्या देशाने आगीत तेल ओतत अनेक शेजाऱ्यांना भारताविरुद्ध चिथावण्याचे धोरण राबविले आहे. नेपाळने याआधीही अनेकवेळा सीमारेषेसंदर्भात भारताशी वाद घातलेला आहे. मात्र या वादाला आता आहे तशी आक्रमक भाषेची जोड नसायची. भारत-पाक सीमेचे निर्धारण सुगौली कराराच्या आधीन राहून करावे, असा नेपाळचा आग्रह आहे. मात्र, ब्रिटिश राज्यकर्ते आणि नेपाळ नरेशांच्या दरम्यान झालेल्या या कथित कराराचा मजकूर स्पष्ट करणारी कागदपत्रे नेपाळ सरकारने आजवर प्रकाशात आणलेली नाहीत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले
CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत
कोरोनापाठोपाठ भारतात लवकरच धडकणार दुसरं मोठं संकट; मोदींनी बोलावली तात्काळ बैठक
CoronaVirus: ...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप
CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार