पटेलांचे अखंड काश्मीरचे स्वप्न नेहरूंनी तोडले; पंतप्रधान मोदी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 09:48 IST2025-11-01T09:48:01+5:302025-11-01T09:48:10+5:30
घुसखोरीवर लढा सुरू राहील

पटेलांचे अखंड काश्मीरचे स्वप्न नेहरूंनी तोडले; पंतप्रधान मोदी यांची टीका
एकतानगर : सरदार पटेल यांनी संपूर्ण काश्मीर भारतात विलीन करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी ते होऊ दिले नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीदिनी गुजरातमधील एकतानगर येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडनंतर झालेल्या सभेत त्यांनी सांगितले की, घुसखोरीमुळे भारताच्या लोकसंख्येचा समतोल बिघडत आहे. देशाने आता त्याविरुद्ध निर्णायक लढा देण्याचा निर्धार केला आहे.
'कलम ३७० रद्द करून सरदार पटेलांचे स्वप्न पूर्ण'
जम्मू आणि काश्मीरबाबतचे कलम ३७० हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकसंध भारताचे स्वप्न पूर्ण केले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले. स्वातंत्र्यानंतर या देशात ५६२ संस्थाने होती.
त्यांचे भारतात विलीनीकरण करणे ही अशक्य कामगिरी पटेल यांनी पूर्ण केली. काठियावाड, भोपाळ, जुनागढ, जोधपूर, त्रावणकोर, हैदराबाद या संस्थानांनी स्वतंत्र राहण्याचे प्रयत्न केले. मात्र पटेल यांनी सर्वांचे देशात विलीनकरण केले, असे शाह म्हणाले.