उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:07 IST2026-01-14T14:05:59+5:302026-01-14T14:07:56+5:30

NEET PG Cut Off Criteria: कट-ऑफ घटवण्याच्या निर्णयाने देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

NEET PG Cut Off Criteria: Controversy over decision to reduce cut-off; Those scoring minus 40% will also get admission | उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद

उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद

NEET PG Cut Off Criteria: केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने NEET PG २०२५ च्या क्वालिफाइंग कट-ऑफमध्ये मोठी कपात केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय. या निर्णयामुळे SC, ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना आता उणे ४०पर्सेंटाइल गुण मिळाले तरीही MS-MD सारख्या पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. जनरल आणि EWS प्रवर्गासाठीही कट-ऑफ कमी करण्यात आला आहे.

हा निर्णय मुख्यतः मेडिकल पीजी कोर्सेसमधील हजारो रिक्त जागा भरून काढण्यासाठी घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, या धोरणामुळे देशाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.

कट-ऑफमध्ये किती आणि का कपात?

आतापर्यंत SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी NEET PG मध्ये किमान ४० पर्सेंटाइल आवश्यक होता. म्हणजेच 800 गुणांच्या परीक्षेत साधारण २३०-२४० गुण मिळवणे बंधनकारक होते. मात्र, नव्या निर्णयानुसार हा निकष थेट शून्यपेक्षा खाली आणण्यात आला आहे. याचा अर्थ, अत्यंत कमी किंवा निगेटिव्ह स्कोअर असलेले उमेदवारही जागा उपलब्ध असल्यास प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा NEET PG २०२५ ची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू असून, तिसरी काउंसिलिंग अद्याप सुरू झालेली नाही. अंदाजे ९ हजारांहून अधिक पीजी मेडिकल सीट्स रिक्त राहण्याची शक्यता होती. पात्र उमेदवारांची संख्या अपुरी असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या निर्णयावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

या निर्णयावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

एका डॉक्टराने लिहिले आहे की, “जीवन-मरणाशी थेट संबंधित असलेल्या वैद्यकीय क्षेत्रात किमान पात्रतेशी तडजोड करणे अत्यंत धोकादायक आहे. जगात कदाचित आपणच असा देश आहोत, जिथे अशा प्रकारची घसरण प्रोत्साहितही केली जाते.”

दुसऱ्या एका युजरने चिंता व्यक्त करत म्हटले की, “ही पॉलिसी बनवणारे लोक स्वतः कधीही अशा डॉक्टरांकडून उपचार करून घेणार नाहीत. सामान्य, मेहनती आणि कर भरणाऱ्या नागरिकांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.”

PG स्तरावर फक्त मेरिट हवे... 

काही जणांच्या मते, MBBS चे पाच-साडेपाच वर्षांचे कठोर शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एक सक्षम डॉक्टर बनतो. त्यामुळे PG स्तरावर आरक्षणाऐवजी केवळ मेरिटच निकष असावा. विशेषतः आर्थिक निकषांव्यतिरिक्त इतर आधारांवर सवलत देणे योग्य आहे का, यावरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होणार का?

अनेकांच्या मते ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. रिक्त जागा राहिल्यास आरोग्यसेवा अधिकच अडचणीत येईल. मात्र विरोधकांचा सवाल आहे की, प्रवेशाचे निकष खूपच शिथिल केल्यास वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title : नीट पीजी एडमिशन: कट-ऑफ में गिरावट से विवाद, गुणवत्ता पर चिंता।

Web Summary : नीट पीजी कट-ऑफ में कमी से नकारात्मक अंकों के साथ भी प्रवेश संभव, आक्रोश। इस कदम का उद्देश्य रिक्त सीटें भरना है, लेकिन चिकित्सा शिक्षा के गिरते मानकों और स्वास्थ्य सेवा की गुणवत्ता पर संभावित प्रभाव के बारे में गंभीर चिंताएं बढ़ रही हैं।

Web Title : NEET PG Admission: Cut-off drop sparks controversy, concerns over quality.

Web Summary : NEET PG cut-off reduction allows admission even with negative scores, sparking outrage. The move aims to fill vacant seats, but raises serious concerns about declining medical education standards and potential impact on healthcare quality.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.