गांधीजींचे विचार न अंगीकारल्याने आत्मनिर्भर भारत मोहिमेची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 02:36 IST2020-09-28T02:36:06+5:302020-09-28T02:36:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी; कोरोना संकटात शेतकरी डगमगला नाही

गांधीजींचे विचार न अंगीकारल्याने आत्मनिर्भर भारत मोहिमेची गरज
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचे अर्थव्यवस्थेसंदर्भातील विचार आचरणात आणले असते, तर आत्मनिर्भर भारत ही मोहीम राबविण्याची गरजच निर्माण झाली नसती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘मन की बात’द्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला.
ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत निर्माण होण्यासाठी शेती व शेतकरी हे दोन घटक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. काही वर्षांपूर्वी काही राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्याच्या कक्षेतून फळे, भाज्या यांना मुक्त केल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा झाला. कोरोना काळात शेतकऱ्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे संकटाचा सामना केला. ते म्हणाले की, कृषीविषयक महत्त्वाची विधेयके संसदेत नुकतीच मंजूर झाली ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
या विधेयकांतील तरतुदींमुळे शेतकºयांना पिकविलेले अन्नधान्य कोणाला विकायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. भारतीय सैन्याने २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानच्या हद्दीत सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ उद््ध्वस्त केले होते. या घटनेला यावर्षी २९ सप्टेंबरला चार वर्षे पूर्ण होत आहेत. मातृभूमीच्या रक्षणासाठी भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईकची मोलाची कामगिरी बजावली होती, असे मोदी म्हणाले.
गोष्टींच्या माध्यमातून कुटुंबाला जोडता येईल
च्मोदी यांनी सांगितले की, कथाकथन ही एक उत्तम कला आहे. कोरोना साथीमुळे कुटुंबातील बहुतेक लोक घरात थांबल्यामुळे त्याचा एक फायदा असा झाला की, हे लोक परस्परांना वेळ देऊ शकले.
च्मात्र, काही कुटुंबांमधील लोक आपली मूल्ये विसरत चालले आहेत. त्यांना गोष्टी सांगण्याच्या कलेच्या माध्यमातून परस्परांच्या जवळ आणता येईल.