शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

‘जेट’सारख्या प्रकरणांत कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नियामक प्राधिकरणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 4:03 AM

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशननची मागणी; लवकरच केंद्रीय हवाई वाहतूकमंत्र्यांची घेणार भेट

मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने, सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांना आपला रोजगार गमवावा लागला. जेट एअरवेजचे कर्मचारी व अधिकारी रस्त्यावर आलेले असताना, जेटचे माजी अध्यक्ष नरेश गोयल मात्र आपल्या विश्वात मग्न आहेत, असा आरोप फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनने केला.या कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र नियामक प्राधिकरणाची गरज असल्याचे मत फेडरेशन आॅफ आॅल इंडिया एव्हिएशनने व्यक्त केले आहे.जेटच्या कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचे थकीत वेतन, इतर देणी मिळवून देण्यासाठी फेडरेशनतर्फे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमवेत लवकरच केंद्रीय हवाई वाहतूकमंत्र्यांची भेट घेण्यात येईल व त्यांचे वेतन मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी करण्यात येणार आहे. थकीत वेतन व इतर अनुषंगिक देणी मिळण्यासाठी गरज पडल्यास फेडरेशन न्यायालयात दाद मागणार आहे. सध्या देशात कोणताही विमान अपघात किंवा दुर्घटना घडली, तर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) चौकशीचे व विमान कंपन्यांच्या कारभाराबाबत नियंत्रणाचे अधिकार आहेत. मात्र, जेट एअरवेजप्रमाणे इतर प्रकरणे घडली, तर कर्मचाºयांना न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र नियामक प्राधिकरण असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय हवाई वाहतूकमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष प्रदीप मेनन, सरचिटणीस नितीन जाधव व मुख्य संघटक किशोर चित्राव यांनी दिली.नोकरी मिळविण्याचे आव्हानजेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनाची शक्यता मावळल्याने कर्मचाºयांना प्रचंड नैराश्य आले आहे. काही कर्मचाºयांनी इतर हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये नोकरी स्वीकारली आहे, तर काही ज्येष्ठ कर्मचाºयांनी दुसरे क्षेत्र निवडले आहे. हवाई वाहतूक क्षेत्रात ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्मचाºयांना नोकरी बदलणे अत्यंत अडचणीचे ठरते. अनेकांना नोकरी मिळविणे कठीण होते. जेट एअरवेज बंद पडल्याने, अशा चाळीस वयापेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाºयांसमोर नोकरी मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यांना हे क्षेत्र सोडून इतर क्षेत्रामध्ये कमी वेतनावर नोकरी मिळवावी लागली आहे. त्यामुळे कर्मचाºयांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे, अशी मागणीही फेडरेशन आॅफ आॅल इंडिया एव्हिएशननने केली आहे.

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेज