सत्ताधारी vs विरोधक: लोकसभा आणि राज्यसभेत कोणाचे सर्वाधिक खासदार? पाहा आकडेवारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 02:25 PM2023-07-18T14:25:43+5:302023-07-18T14:26:35+5:30

NDA vs UPA: बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीत 26 पक्ष सामील झाले आहेत, तर एनडीएच्या दिल्लीतील बैठकीत 38 पक्षांनी हजेरी लावली आहे.

NDA vs UPA: Who has the most MPs in Lok Sabha and Rajya Sabha? Check out the list | सत्ताधारी vs विरोधक: लोकसभा आणि राज्यसभेत कोणाचे सर्वाधिक खासदार? पाहा आकडेवारी...

सत्ताधारी vs विरोधक: लोकसभा आणि राज्यसभेत कोणाचे सर्वाधिक खासदार? पाहा आकडेवारी...

googlenewsNext

NDA vs UPA: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत एनडीएची बैठक होत आहे, ज्यात 38 पक्ष सहभागी झाले आहेत. दुसरीकडे, बंगळुरुत सुरू असलेल्या विरोधकांच्या बैठकीत 26 पक्षांनी हजेरी लावली आहे. या बैठकांदरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत कोणाचे अधिक उमेदवार आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

जाणून घेऊया की, भाजप आणि एनडीए जागांच्या बाबतीत किती मजबूत आहेत आणि विरोधी पक्षांचीही काय स्थिती आहे? दरम्यान, लोकसभेतील खासदारांबद्दल बोलायचे झाले, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकूण 301 जागा मिळवल्या होत्या. एनडीएतील मित्रपक्षांसह त्यांची संख्या 333 आहे.

कोणत्या पक्षाचे किती खासदार?

लोकसभेतील NDAची ताकत:-

  • भारतीय जनता पार्टी- 301
  • शिवसेना- 12
  • लोक जनशक्ती पार्टी- 6
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- 3
  • अपक्ष- 2
  • अपना दल (सोनीलाल)- 2
  • आजसू पार्टी- 1
  • अखिल भारतीय अन्ना द्रविडम मुनेत्र कडगम- 1
  • मिजो नॅशनल फ्रंट- 1
  • नागा पिपल्स फ्रंट- 1
  • नॅशनल पिपुल्स पार्टी- 1
  • नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी- 1
  • सिक्किम क्रांतिकारी मोर्चा- 1
  • एकूण- 333

लोकसभेतील UPA ची ताकत:-

  • काँग्रेस- 50
  • डीएमके- 24
  • तृणमूस काँग्रेस- 23
  • जेडीयू- 16
  • इंडियन यूनियन मुस्लिम लीग- 3
  • जम्मू आणि कश्मीर नॅशनल कॉन्फ्रेंस- 3
  • समाजवादी पार्टी- 3
  • भारतीय कम्युनिस्ट पार्टी- 3
  • आम आदमी पार्टी- 1
  • झारखंड मुक्ति मोर्चा- 1
  • केरळ काँग्रेस (एम)- 1
  • रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी- 1
  • विदुथलाई चिरुथिगल काची- 1
  • शिवसेना- 7
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- 3
  • एकूम - 142

लोकसभेतील तटस्त खासदार

  • वायएसआर काँग्रेस- 22
  • बीजू जनता दल- 12
  • बहुजन समाज पार्टी- 9
  • तेलंगाना राष्ट्र समिती- 9
  • तेलुगु देशम पार्टी- 3
  • ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन- 2
  • शिरोमणि अकाली दल- 2
  • ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट-1
  • जनता दल (सेक्युलर)- 1
  • राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी- 1
  • शिरोमणी अकाली दल (सिमरनजीत सिंह मान)- 1
  • अपक्ष- 1
  • एकूण- 64

राज्यसभेतील NDA ची ताकत

  • भारतीय जनता पार्टी- 92
  • थेट नियुक्ती- 5
  • एआयएडीएमके- 4
  • असम गण परिषद- 1
  • मिजो नॅशनल फ्रंट- 1
  • नॅशनल पिपुल्स पार्टी- 1
  • पट्टाली मक्कल काची- 1
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठावले)- 1
  • सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट- 1
  • तमिळ मनीला काँग्रेस (मूपनार)- 1
  • यूनायटेड पिपुल्स पार्टी (लिबरल)- 1
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- 1
  • अपक्ष- 1
  • एकूण- 111

राज्यसभेतील UPA ची ताकत

  • काँग्रेस- 31
  • तृणमूल काँग्रेस- 12
  • आम आदमी पार्टी- 10
  • डीएमके- 10
  • राजद- 6
  • सीपीआई (एम)- 5
  • जेडीयू- 5
  • एनसीपी- 3
  • अपक्ष किंवा अन्य- 2
  • समाजवादी पार्टी- 3
  • शिवसेना- 3
  • भारतीय कम्युनिस्ट पार्टी- 2
  • झारखंड मुक्ति मोर्चा- 2
  • इंडियन यूनियन मुस्लिम लीग- 1
  • केरळ काँग्रेस (एम)- 1
  • मरुमलारची द्रविड़ मुनेत्र कड़गम- 1
  • राष्ट्रीय लोकदल- 1
  • एकूण- 98

राज्यसभेतील तटस्त खासदार

  • बीजू जनता दल- 9
  • वायएसआर काँग्रेस- 9
  • भारत राष्ट्र समिती- 7
  • बहुजन समाज पार्टी- 1
  • जनता दल (सेक्युलर)- 1
  • तेलुगु देशम पार्टी- 1
  • एकूण- 28

Web Title: NDA vs UPA: Who has the most MPs in Lok Sabha and Rajya Sabha? Check out the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.