शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; भाजपा, जेडीयू प्रत्येकी 17 जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 15:43 IST

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली जेडीयू, लोक जनशक्ती पक्षाची बैठक

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये एनडीएचं  जागावाटप निश्चित झालं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर याबद्दलची घोषणा झाली. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि त्यांचे चिरंजीव खासदार चिराग पासवान उपस्थित होते. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी 17, तर लोक जनशक्ती पक्ष 6 जागांवर निवडणूक लढवेल. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीए गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास अमित शहांनी बैठकीनंतर व्यक्त केला. तर मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी 2009 पेक्षा अधिक जागा जिंकून दाखवू, असा दावा केला. राज्यसभेच्या पुढील निवडणुकीत रामविलास पासवान यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती अमित शाह यांनी दिली. 'तिन्ही पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागावाटप करण्यात आलं. लवकरच आम्ही आमचा अजेंडा लोकांसमोर ठेऊ,' असं शहा यांनी सांगितलं.  एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला, तरी अद्याप कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळणार हे ठरलेलं नाही, अशी माहिती मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी दिली. 'आज जागावाटप निश्चित झालं आहे. कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, हे अजून ठरलेलं नाही. मात्र ते लवकरच ठरेल,' अशी माहिती कुमार यांनी दिली. 'आम्ही बिहारमध्ये चांगलं यश मिळवलं आहे. मला गरजेपेक्षा जास्त बोलायची सवय नाही. 2009 मध्ये भाजपा आणि जेडीयूची युती होती. त्यावेळी आम्ही  बिहारमध्ये 40 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्ही त्यापेक्षा जास्त जागा जिंकू,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :BiharबिहारAmit Shahअमित शाहBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार