शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, या 7 देशांचे नेते होणार सहभागी; अशी असेल सुरक्षा व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 11:15 IST

या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 293 जागा जिंकल्या आहेत. यात एकट्या भाजपच्या 240 जागा आहेत...

लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवार सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 293 जागा जिंकल्या आहेत. यात एकट्या भाजपच्या 240 जागा आहेत. या शपथ विधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो, ड्रोन आणि 'स्नायपर्स' तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, परदेशी पाहुणे राजधानीतील लीला, आयटीसी मौर्य, ताज, ओबेरॉय आणि क्लेरिजेस हॉटेल्समध्ये थांबणार आहेत. यामुळे हे हॉटेल्स देखील सुरक्षेच्या कक्षेत घेण्यात आले आहेत.

पोलीस आणि एनएसजीचे कमांडो असतील तैनात - शपथविधी सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी दिल्ली पोलिसांचे स्वॅट आणि एनएसजी कमांडो तैनात असतील. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार, या समारंभाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा योजना तयार करण्यासाठी पोलीस मुख्यालय आणि नवी दिल्ली जिल्ह्यात अनेक बैठका घेतल्या. शपथ विधी समारंभ राष्ट्रपती भवनात होणार असल्याने या परिसरात आणि बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असेल. बाहेरील घेऱ्यात दिल्ली पोलिसांतील जवान तैनात असतील. यानंतर निमलष्करी दल तैनात असेल आणि आतील घेऱ्यात राष्ट्रपती भवनाच्या अंतर्गत सुरक्षेतील जवान तैनात असतील.

अशी असेल सुरक्षा व्यवस्था -संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या आणि दिल्ली सशस्त्र पोलीस (डीएपी) दलासह सुमारे 2,500 पोलीस कर्मचारी घटनास्थळाभोवती तैनात करण्याची योजना आहे. आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्यवर ज्या मार्गांचा वापर करतील त्या मार्गावर 'स्नायपर' आणि सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी तैनात असतील. तसेच नवी दिल्ली जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोनही तैनात करण्यात येणार आहेत.

हे नेते असतील उपस्थिती - श्रीलंकेचे राष्ट्रपती - रानिल विक्रमसिंघेमालदीवचे राष्ट्रपती - डॉ मोहम्मद मुइज्जूसेशेल्सचे उपराष्ट्रपती - अहमद अफीकबांगलादेशच्या पंतप्रधान - शेख हसीनामॉरीशसचे पंतप्रधान - प्रविंद कुमार जुगनुथनेपाळचे पंतप्रधान - पुष्प कमल दहल 'प्रचंड'भूतानचे पंतप्रधान - शेरिंग टोबगे

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीPresidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूprime ministerपंतप्रधानBJPभाजपा