शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

"या तर्काच्या आधारावर NDA ने सुद्धा मार्गारेट अल्वा यांनाच पाठिंबा द्यायला हवा"; राष्ट्रवादीच्या नेत्याची 'गुगली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 15:39 IST

मार्गारेट अल्वा या विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार

Vice Presidential Election 2022: देशात सोमवारी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात ही निवडणूक रंगली. आता ६ ऑगस्टला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीए कडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना तर विरोधी पक्षाकडून संयुक्तपणे मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावर भाष्य करताना एक तर्काच्या आधारावर भाजपाप्रणित एनडीए ने विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनाच मतदान केले पाहिजे असे मत राष्ट्रवादीकडून मांडण्यात आले आहे.

सोमवारी झालेल्या निवडणुकीत ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशातील १० राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तशातच, राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत भाजपाला आवाहन केले आहे. "द्रौपदी मुर्मू यांना NDA ने ज्या विचारसरणीच्या आधारावर राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला, त्याच विचारांच्या आणि तर्कांच्या आधारावर भाजपाप्रणित NDA ने आता मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा द्यायला हवा. कल्पना करा की देशातील दोन सर्वोच्च पदांवर जर महिला असतील तर भारतासाठी ते खूपच अभिमानास्पद असेल. याचा NDA ने नक्कीच गांभीर्याने विचार करायला हवा", असे ट्वीट करत क्रास्टो यांनी NDA च्या नेतेमंडळींसमोर जणू 'गुगली'च टाकली.

दरम्यान, सोमवारी राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रात मतदान पार पडले. महाराष्ट्रात राष्ट्रपती पदासाठीच्या या निवडणुकीत एकूण २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ सदस्यांना मात्र विविध कारणांमुळे आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. दिवसभर चाललेल्या या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, सत्ताधारी भाजपा आणि विरोधक यांच्याकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. भाजपाच्या बबनराव लोणीकरांचा नंबर असतानाही काँग्रेसच्या नितीन राऊतांनी आधी मतदान केल्याने त्यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. तसेच, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान क्रॉस वोटिंग केल्याचा दावाही सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. तर आमच्या आमदारांवर आमचा विश्वास असल्याचे विरोधकांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस