Rohit Patil Meets Nitin Gadkari: “तू बिनधास्त जा, सांगितलेलं काम झालं असं समज”; रोहित पाटलांनी शेअर केला गडकरी भेटीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 01:44 PM2022-04-06T13:44:12+5:302022-04-06T13:45:09+5:30

Rohit Patil Meets Nitin Gadkari: दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणे गरजेचे आहे, या वाक्याची प्रचिती आली, असे रोहित पाटील यांनी नितीन गडकरी भेटीनंतर म्हटले आहे.

ncp rohit patil meets union minister nitin gadkari and share his experience on twitter | Rohit Patil Meets Nitin Gadkari: “तू बिनधास्त जा, सांगितलेलं काम झालं असं समज”; रोहित पाटलांनी शेअर केला गडकरी भेटीचा किस्सा

Rohit Patil Meets Nitin Gadkari: “तू बिनधास्त जा, सांगितलेलं काम झालं असं समज”; रोहित पाटलांनी शेअर केला गडकरी भेटीचा किस्सा

googlenewsNext

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्या कामांसाठी ओळखले जातात. तसेच सत्ताधारी असो किंवा विरोधक कुणाचेही काम असेल तरी नितीन गडकरी दखल घेत नाही असे होत नाही, अशी त्यांची ख्याती असल्याचे बोलले जाते. असाच अनुभव महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील (R.R.Patil) यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) यांना आला. कवठेमहांकाळ नगर पंचायतीची निवडणूक जिंकल्यानंतर ते अचानक प्रकाशझोतात आले. रोहित पाटील यांनी नवी दिल्लीत जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेतली. याचा किस्सा रोहित पाटील यांनी शेअर करत, दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणे गरजेचे आहे, या वाक्याची प्रचिती आल्याचे म्हटले आहे. 

कवठेमहांकाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर रोहित पाटील यांचे राज्यभर कौतुक झाले. केवळ सत्ताधारी नाही, तर विरोधकांनीही रोहित पाटील यांच्या कामाची आणि यशाची प्रशंसा केली. निवडणूक जिंकल्यानंतर नगरपंचायतीच्या क्षेत्रातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी रोहित पाटील यांनी काही नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून रोहित पाटील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटले. गडकरी भेटीचा अनुभव रोहित पाटील यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. 

तू बिंदास्त जा, सांगितलेले काम झाले असे समज

दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणे गरजेचं आहे ह्या वाक्याची प्रचिती आली. आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेले काम झाले असे समज हे वाक्य धीराचे होते. दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली, असे ट्विट रोहित पाटील यांनी केले आहे. यासोबत नितीन गडकरींच्या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. त्याचबरोबर नितीन गडकरींनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीबाबत माहिती घेऊन अभिनंदन केले, असेही रोहित यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २३ वर्षीय रोहित पाटील यांनी विरोधकांना धूळ चारत कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे रोहित यांच्या या विजयाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. रोहित पाटील यांची कारकिर्द खऱ्या अर्थाने विजयापासून सुरू झाली. त्यांच्या या कामगिरीची राष्ट्रवादीने दखल घेऊन त्यांच्यावर राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच युवक अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे रोहित पाटील यांचं राष्ट्रवादीतील आणि जिल्ह्यातील वजनही वाढले आहे.
 

Web Title: ncp rohit patil meets union minister nitin gadkari and share his experience on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.