शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'मुलायम' इच्छेवर पवारकन्या म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 7:10 PM

सुप्रिया सुळेंच्या विधानात शरद पवारांच्या शैलीची झळक

नवी दिल्ली: राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. सोळाव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याचाच प्रत्यय आला. राजकारणात कोण कधी कोणाची बाजू घेईल आणि कोण कोणाच्या विरोधात जाईल, याची प्रचिती आज लोकसभेत आणि लोकसभेबाहेरदेखील आली. समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यांनी चक्क नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी मोदींना शुभेच्छादेखील दिल्या. मुलायम यांची ही इच्छा ऐकून मोदींच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्या या विधानावरुन सूचक प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे सुप्रिया यांच्या विधानात पवार स्टाईलची झलक पाहायला मिळाली.सोळाव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुलायम सिंह यांनी केलेल्या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. मी पंतप्रधानांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असं मला वाटतं. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्व सदस्य निवडून यावेत आणि तुम्ही पुन्हा पंतप्रधान व्हावं, असं वक्तव्य मुलायम यांनी केलं. मुलायम सिंह यांच्या या विधानानंतर लोकसभेच्या पुढच्या बाकावर बसलेल्या सोनिया गांधींनाही हसू आलं. मुलायम सिंह यांच्या या इच्छेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सदनाबाबेर सूचक भाष्य केलं. 2014 मध्येही मुलायम सिंह यांनी अशीच इच्छा व्यक्त केली होती, याकडे सुळे यांनी लक्ष वेधलं. 'मुलायम सिंह यांचं विधान मी ऐकलं. ते 2014 मध्येदेखील असंच म्हणाले होते. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते,' अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळेंनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये शरद पवारांच्या शैलीत मुलायम यांच्या विधानावर भाष्य केल्याची चर्चा यानंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली. मुलायम यांनी 2014 मध्ये मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत मनमोहन सिंग यांचं सरकार गेलं. आता त्याच मुलायम सिंहांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुढचं काय ते समजून जा, असा अर्थ सुळे यांच्या विधानामागे असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Manmohan Singhमनमोहन सिंगprime ministerपंतप्रधानNCPराष्ट्रवादी काँग्रेसMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादव