Naxalites: नक्षलवाद्यांनी केली भाजपा नेत्याची हत्या, पत्रकं टाकून दिला इशारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 10:33 IST2023-06-22T10:10:52+5:302023-06-22T10:33:26+5:30

Naxalites killed a BJP leader: छत्तीसगडमधील बिजापूर येथे नक्षलवाद्यांची दहशत संपण्याचं नाव घेत नाही आहे. नव्या घटनेत नक्षलवाद्यांनी इल्मीडी गावामध्ये भाजपा नेत्याची हत्या केली आहे.

Naxalites killed a BJP leader, dropped leaflets and appealed... | Naxalites: नक्षलवाद्यांनी केली भाजपा नेत्याची हत्या, पत्रकं टाकून दिला इशारा...

Naxalites: नक्षलवाद्यांनी केली भाजपा नेत्याची हत्या, पत्रकं टाकून दिला इशारा...

छत्तीसगडमधील बिजापूर येथे नक्षलवाद्यांची दहशत संपण्याचं नाव घेत नाही आहे. नव्या घटनेत नक्षलवाद्यांनी इल्मीडी गावामध्ये भाजपा नेत्याची हत्या केली आहे. हत्या झालेल्या भाजपा नेत्याचं नाव काका अर्जुन आहे. एएसपी चंद्रकांत गोवर्ण यांनी या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळावर नक्षलवाद्यांनी पत्रकेही फेकली. नक्षलवाद्यांच्या मद्देड एरिया कमिटीने भाजपा नेत्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. एवढंच नाही तर नेत्यांनाही धमकी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी बीजापूर मुख्यालयापासून सुमारे ५२ किमी अंतरावर भाजपा नेत्याची हत्या केली. नक्षलवाद्यांनी दबा धरून अर्जुन यांच्यावर हल्ला केला. काक अर्जुन घरातून बाहेर पडताच हत्यारबंद नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. काका अर्जुन यांनी इल्मीडी गावातील माजी सरपंच होते.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

बीजापूरमध्ये नक्षवाद्यांनी केलेल्या हत्याकांडाबद्दल छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांनी ट्विट करून दिवंगत भाजपा नेत्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  छत्तीसगडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. आज इल्मिडी गावात भाजपा नेते काका अर्जुन यांची हत्या करून नक्षलवाद्यांनी क्रौर्य दाखवलं आहे. मी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे रमण सिंह म्हणाले. 

Web Title: Naxalites killed a BJP leader, dropped leaflets and appealed...