Naxalite Blast: नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रॅकवर मध्यरात्री बॉम्बस्फोट, रेल्वेसेवा तात्काळ थांबवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 08:15 IST2022-01-27T08:14:32+5:302022-01-27T08:15:49+5:30
गिरीडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे

Naxalite Blast: नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रॅकवर मध्यरात्री बॉम्बस्फोट, रेल्वेसेवा तात्काळ थांबवली
रांची - झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हिंसाचाराचे कृत्य केलंय. येथील गिरीडीहच्या जवळील रेल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट घडवून रेल्वे पटरी उडवून टाकण्यात आली आहे. त्यामुळे, या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ग्रँड कार्ड रेल्वे मार्गावरील चीचाकी आणि चौधरी बांध रेल्वे स्टेशनवरच्या दरम्यान हा स्फोट घडवून आणला आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
गिरीडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच या मार्गावरील हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा थांबविण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. तसेच, काही रेल्वेंना दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आले आहे.