शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik: नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात, मग अकाऊंवरुन ट्विट कोण करतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:06 IST

Nawab Malik: नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे

मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले होते. त्यांतरच्या 8 तासांच्या चौकशीनंतर अखेर मलिक यांना ईडीनं अटक केली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर दिवसभरातून राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या भूमिका मलिक यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात येत आहेत. 

नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या असून ट्विटरवरुन या सर्वच प्रतिक्रिया शेअर करण्यात आल्या आहेत. मलिक यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आणि त्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती शेअर करण्यात येत आहे. नवाब मलिक यांच्या कार्यालयीन ट्विटर हँडलवरुन सर्वप्रथम सकाळी 10.23 वाजता मलिक यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती देण्यात आली.  नवाब मलिक यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट रिट्विट केलं आहे. त्यानंतर, सर्वच घटनाक्रम या दोन्ही ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे, जर नवाब मलिक हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी असतील तर त्यांचं ट्विटर अकाऊंट कोण चालवतंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे अधिकार कोणाला दिले आहेत, तसेच त्यावर लिहिणारी, ट्विट करणारी व्यक्ती ही मलिकांच्या खास विश्वासातील असेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. तर, ईडीच्या चौकशीत असताना अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करता येते का? हाही प्रश्न उपस्थित होत आहे.  दरम्यान, मलिक यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन 3.46 वाजता ट्विट करण्यात आलं आहे. त्यामध्ये, लढेंगे, जितेंगे और सबको एक्सपोज करेंगे! असे ट्विट करण्यात आले आहे. तर, 4.39 वाजात नवाब मलिक यांनी एक ट्विट रिट्विट केलं आहे. बाबाजानी दुर्रानी यांचं हे ट्विट रिट्विट करण्यात आलं आहे. त्यामध्ये, ना डरेंगे.. ना झुकेंगे... सत्य जिंकेलच, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसTwitterट्विटरCrime Newsगुन्हेगारीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय