शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नवजोत सिंग सिद्धू काँग्रेसमध्येच राहणार, मुख्यमंत्र्यांसोबत काही बाबींवर सहमती झाल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 8:34 AM

नवजोत सिंग सिद्धूंनी काल पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची भेट घेतली होती.

नवी दिल्ली: सध्या पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबवर सर्वांचीच नजर आहे. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी काल झालेल्या बैठकीत काही नियुक्त्या मागे घेण्यास सहमती दर्शवली. यामुळे आता नवज्योतसिंग सिद्धूकाँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचं कळतंय. 

नवीन मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारताच पंजाबमधील मंत्री, पोलीस प्रमुख आणि अॅटर्नी जनरल यांच्यासह प्रमुख नियुक्त्यांमुळे सिद्धू नाराज होते. पण, आता चन्नी यांनी सिद्धूंच्या किमान एका मागणीवर समती दर्शवली आहे. यानंतर सिद्धूंनीही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या काही नियुक्त्यांवर सहमती दर्शवली. दरम्यान, पंजाबमधील आगामी निवडणुका पाहता आणि कारभाराला मजबूत आधार देण्यासाठी काँग्रेसने एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

चन्नी यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी सिद्धूंनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असल्याची माहिती दिली होती, "मुख्यमंत्र्यांनी मला चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. पंजाब भवन, चंदीगड येथे आज दुपारी 3:00 वाजता बैठकीसाठी पोहोचेल. कोणत्याही चर्चेसाठी त्यांचे स्वागत आहे," असं सिद्दू आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते. 

सिद्धूंचा काँग्रेसला धक्काजुलै महिन्यात पंजाबचे प्रदेशाध्यक्ष बनवलेल्या सिद्धूंनी मंगळवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देत सिद्धूंनी "पंजाबच्या भविष्याशी आणि पंजाबच्या हिताच्या अजेंड्याशी कधीही तडजोड करू शकत नाहीत,"असे म्हटले होते. सिद्धू यांचा राजीनामा गांधी कुटुंबासाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता. कारण, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या जवळ मोठा राजकीय धोका पत्करून अमरिंदर सिंग यांच्या विरोधात सिद्धूंचे समर्थन केले होते.

टॅग्स :PunjabपंजाबNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी