शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

ट्रिपल तलाक विधेयकाच्या मतदानाला राष्ट्रवादी तटस्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 2:55 AM

बदलत्या राजकीय घडामोडी : विधेयक मंजुरीसाठी सरकारकडून आकड्यांची जुळवाजुळव

हरीश गुप्ता नवी दिल्ली : राजकारणातील बदलत्या आश्चर्यजनक घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने असे संकेत दिले आहेत की, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करण्यात अडथळा आणणार नाहीत. ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या भाजपसाठी हा मोठा आधार ठरणार आहे. राष्ट्रवादी हा काँग्रेसचा सहकारी पक्ष असून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ते काँग्रेससोबत आघाडीनेच लढतात. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, या विधेयकासाठी पक्ष मत देऊ शकत नाही. पण, एक गोष्ट स्पष्ट आहे की, आम्ही या विधेयकाविरुद्ध मत देणार नाही.

राष्ट्रवादीची ही भूमिका भाजपसाठी सोयीची ठरणार आहे. २४० सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे ७८ सदस्य आहेत. एनडीएचे ९७ खासदार आहेत. यात ३ नियुक्त आणि ४ अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. यात जनता दल यूनायटेडच्या त्या ६ सदस्यांचा समावेश नाही ज्यांचा या विधेयकाला विरोध आहे. अण्णाद्रमुक आणि बिजू जनता दल यांनी या विधेयकाला सहकार्य करण्याचे संकेत दिले आहेत. या दोन पक्षांचे २० सदस्य आहेत. यामुळे भाजप जनता दल यूनायटेडशिवाय ११७ पर्यंत पोहचणार आहे.

आकडे काय सांगतात?उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, वायएसआर काँग्रेस (२), पीडीपी (२) आणि जेडीएस (१) हेही आपापल्या राज्यातील परिस्थितीमुळे तटस्थ राहतील. राष्ट्रवादीच्या ४ खासदारांसह ९ सदस्य तटस्थ राहिल्याने सभागृहातील संख्याबळ २३१ वर येईल.

भाजपला २३१ पैकी ११७ सदस्यांचे समर्थन आहे. त्यामुळे हे विधेयक कोणत्याही अडचणीशिवाय मंजूर होऊ शकते. संसदेचे अधिवेशन तीन दिवसांनी वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. कारण, सरकारला कुठल्याही परिस्थितीत ट्रिपल तलाक विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घ्यायचे आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा