शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये अशक्य, मुख्यमंत्र्यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 19:23 IST

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करणे शक्य नाही. आणखी किमान पाच महिन्यांचा तरी कालावधी मिळायला हवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले आहे.

ठळक मुद्दे'राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करणे शक्य नाही. आणखी किमान पाच महिन्यांचा तरी कालावधी मिळायला हवा'राष्ट्रीय क्रिडा स्पर्धानिमित्ताने काही कामांच्या निविदा जारी करायला हव्यात पण तारीख निश्चित झाल्यानंतरच निविदा जाहीर करता येईल. सरकारने क्रिडा स्पर्धासाठीच्या कामांवर आतापर्यंत एकूण 316 कोटी रुपये खर्च केले आहेत.

पणजी - राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करणे शक्य नाही. आणखी किमान पाच महिन्यांचा तरी कालावधी मिळायला हवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (24 जुलै) विधानसभेत सांगितले आहे.

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धानिमित्ताने काही कामांच्या निविदा जारी करायला हव्यात पण तारीख निश्चित झाल्यानंतरच निविदा जाहीर करता येईल. काही साहित्य हे विदेशातूनही आणावे लागते, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. भोजन, निवास व्यवस्था आदींच्या कामाची निविदा जारी करण्यापूर्वी तारीख ठरणे गरजेचे असते, असे क्रिडा खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले.

 प्रश्नोत्तराच्या तासावेळी सुदिन ढवळीकर यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. क्रिडा स्पर्धासाठी साधन सुविधांचे काम किती पूर्ण झाले आहे अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर गोवा सरकार तयार असून येत्या ऑगस्टमध्येही काही प्रकल्पांचे उद्घाटन करू, असे मंत्री आजगावकर म्हणाले. ढवळीकर यांनी त्यावर अनेक कामे कशी अपूर्ण आहेत व काही कामांना अजून कसा आरंभ देखील झालेला नाही ते स्पष्ट केले. आपण सरकारचीच यादी वाचून दाखवतो, असे ढवळीकर म्हणाले. कामांसाठी सरकारकडे पैसा आहे काय अशीही विचारणा ढवळीकर यांनी केली.

सरकारने क्रिडा स्पर्धासाठीच्या कामांवर आतापर्यंत एकूण 316 कोटी रुपये खर्च केले आहेत. 158 कोटी रुपये आणखी खर्च केले जातील. त्या शिवाय प्रत्यक्ष क्रिडा स्पर्धाशीनिगडीत सोहळे व उपक्रमांवर आणखी 200 कोटी रुपये खर्च येईल. म्हणजेच क्रिडा स्पर्धावर सरकार 675 कोटींचा खर्च करणार आहे, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून यापूर्वीच्या काळात 82 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये आयोजित करणे शक्य नाही. आम्ही जानेवारीनंतर म्हणजे मे महिन्यापर्यंत आयोजित करू. मात्र भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने तारीख ठरवावी लागेल. नोव्हेंबरमध्ये क्रिडा स्पर्धा घेणे हे गोव्यातील खेळाडूंच्या हिताचे नाही. आमच्या टीमने अजून सराव देखील सुरू केलेला नाही. प्रशिक्षकांचीही नियुक्ती झालेली नाही. शेवटी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा या गोमंतकीय खेळाडूंसाठीही फायद्याच्या ठरायला हव्यात असे मुख्यमंत्री म्हणाले. नवी तारीख लवकर मागून घ्यावी अशी सूचना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत