शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महालोक अदालत आज

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

३१ हजार प्रकरणांचा होणार निपटारा

३१ हजार प्रकरणांचा होणार निपटारा

आज राष्ट्रीय महालोक अदालत

नागपूर : जिल्हा न्यायालयात उद्या होणाऱ्या राष्ट्रीय महालोक अदालतीपुढे ३१ हजार प्रकरणे निपटाऱ्यासाठी ठेवली जाणार आहेत. ही माहिती जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दिली.
राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरण्या वतीने या महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी ९४ पॅनल तयार करण्यात आले आहे. अर्थात ९४ न्यायालयांमध्ये लोक अदालतीचे काम चालणार आहे. महालोक अदालतीपुढे दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये काही प्रकरणे विशेष मोहिमेद्वारे दाखल झालेली आहेत.
राष्ट्रीय महालोक अदालतीपुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये समझोतायोग्य फौजदारी प्रकरणे, परक्राम्य लेखा अधिनियमाच्या कलम १३८ (चेक बाऊन्स) ची प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, भाडेसंबंधी, बँक, पुनर्प्राप्ती प्रकरणे, वहिवाट दावे, डीआरटी प्रकरणे, महसूल प्रकरणे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंबंधी प्रकरणे, वीज, पाणी बील आणि चोरीसंबंधी प्रकरणे, आयकर, सेवाकर आणि अप्रत्यक्ष करासंबंधी प्रकरणे, नोकरीसंबंधी प्रकरणे, वन कायद्याची प्रकरणे, सैन्य छावणी मंडळाची प्रकरणे, रेल्वे दावे, आपदा नुकसान भरपाई आणि किरकोळ अपिलांचा समावेश आहे. पक्षकारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी केले.