चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याबाबत सरकारने बदलली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 23:45 IST2018-01-08T23:09:30+5:302018-01-08T23:45:11+5:30
चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन निकालामध्ये बदल करावा, अशी विनंती केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालायाला केली आहे.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याबाबत सरकारने बदलली भूमिका
नवी दिल्ली - चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन निकालामध्ये बदल करावा, अशी विनंती केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालायाला केली आहे. या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच शपथपत्र सादर करून सांगितले.
2016 साली या संदर्भातील निकाल आल्यानंतर या निर्णयाला पाठिंबा देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध केला होता. आता केंद्राने न्यायालयाला सांगितले की, समितीचा अहवाल मिळाल्यानंतर यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. या मंत्रिगटाच्या समितीची नियुक्ती 5 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. दरम्यान, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या प्रकरणाची पुझील सुनावणी मंगळवारी करणार आहे. आता जोपर्यंत मंत्र्यांच्या समितीची निर्णय येत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात अंतरिम बदस करावा, अशी विनंतीही केंद्र सरकारने केली आहे.