नासाकाचे कामगार आर्थिक अडचणीत

By Admin | Updated: March 21, 2015 00:13 IST2015-03-20T22:39:57+5:302015-03-21T00:13:54+5:30

थकीत वेतन देण्याची युनियनची मागणी

Nasaka workers financial difficulties | नासाकाचे कामगार आर्थिक अडचणीत

नासाकाचे कामगार आर्थिक अडचणीत

थकीत वेतन देण्याची युनियनची मागणी
नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या ४५ महिन्यांचे वेतन थकल्याने आणि संचालक मंडळाची दोन वर्षांपूर्वीच मुदत संपल्याने कामगार प्रचंड आर्थिक विंवचनेत सापडले असून, एका कामगाराचा उपचाराअभावी, तर दुसर्‍या कामगाराचा कर्जबाजारीपणे आत्महत्त्या केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नाशिक साखर कामगार युनियनने केला आहे.
यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत युनियनच्या पदाधिकार्‍यांनी नासाकाच्या कामगारांचे ४५ महिन्यांचे पगार मिळणे बाकी आहे. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना एक रुपयादेखील कारखान्याकडून आतापर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत कामगारांचे जीवन संकटात सापडले आहे. कै. अशोक रामचंद्र फड या कर्मचार्‍यास दवाखान्याच्या उपचारास पैसे नसल्याने मृत्यूस सामोरे जावे लागले आहे, तर १७ मार्च रोजी विठ्ठल शंकर नाठे यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. कामगारांची अशी अवस्था असताना ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस कारखाना बंद असल्याने गाळपास कोठे पाठवावा, अशी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नासाका कामगारांचे आर्थिक विवंचनेतून काही बरे वाईट झाल्यास त्यास नासाका संचालक मंडळ व शासन जबाबदार राहणार असल्याचा आरोप नाशिक साखर कारखाना कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. यावेळी विष्णुपंत गायखे, विनोद नाठे, शंकरराव रोकडे, सुरेश कुमट, विष्णुपंत गायधनी, चिंतामण विंचू आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nasaka workers financial difficulties