VIDEO: "हे आनंदाश्रू आहेत"; अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:59 IST2025-06-25T12:55:38+5:302025-06-25T12:59:16+5:30

अ‍ॅक्सिओम-४ च्या उड्डाणानंतर शुभांशू शुक्ला यांचे पालक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

Nasa Axiom Mission 4 Shubhanshu Shukla spacecraft left for the space station his mother became emotional | VIDEO: "हे आनंदाश्रू आहेत"; अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक

VIDEO: "हे आनंदाश्रू आहेत"; अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक

Nasa Axiom Mission 4: भारताचे अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी २५ जून रोजी दुपारी १२.०१ वाजता एक नवा इतिहास रचला. शुभांशू यांनी अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण केलं. शुभांशू हे चार सदस्यांसह फाल्कन-९ रॉकेटद्वारे ड्रॅगन अंतराळयानात आयएसएसला रवाना झाले आहेत. यापूर्वी अ‍ॅक्सिओम-४ मोहीम अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी शुभांशू शुक्ला निरोप देताना त्यांच्या आई भावुक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळयानाने उड्डाण घेताच त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले.

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे ऐतिहासिक अंतराळ उड्डाणासाठी रवाना झाले आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी निघालेल्या या भारतीय सुपुत्राने केवळ देशाचेच नाही तर त्यांच्या कुटुंबाचेही नाव मोठं केलं आहे. अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचा हा क्षण त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप भावनिक होता. शुभांशू शुक्ला हे अंतराळयातून अवकाशात झेपवाताच त्यांच्या आईला रडू कोसळलं. मुलाच्या काळजीपोटी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हा क्षण अनुभवताना त्या स्वतःला धीर देत होत्या. त्यांचा हा भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

यशस्वी प्रक्षेपणानंतर शुभांशू शुक्लांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या आई आशा शुक्ला त्यांच्या भावना व्यक्त करताना भावनिक झाल्या. त्या "आम्हाला आमच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. आम्हाला शुभांशूबद्दल कोणतीही भीती नाही. आम्हाला खूप आनंद आहे, खूप अभिमान आहे हे आनंदाश्रू आहेत," असं आशा शुक्ला म्हणाल्या.

दरम्यान, या ऐतिहासिक क्षणाचे सेलिब्रेशन करण्यासाठी, शुभांशू यांचे पालक, शाळेती विद्यार्थी आणि शिक्षकांसह लाईव्ह लाँचिंग पाहत होते. या प्रसंगी त्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेने एक बँड आणि विशेष सजावटीची व्यवस्था केली. दुसरीकडे, शुभांशू यांचे वडील शंभू दयाळ शुक्ला म्हणाले, "ही कामगिरी केवळ लखनऊसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची आहे. आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत. हा क्षण आमच्यासाठी खूप खास आहे. आमचे आशीर्वाद नेहमीच त्याच्यासोबत आहेत."

काय आहे अ‍ॅक्सिओम-४ मोहिम?

प्रक्षेपणानंतर, ड्रॅगन अंतराळयान १ दिवस ०३ तास ​​२३ मिनिटांचा प्रवास करे आणि नंतर ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर डॉक करेल. डॉकिंग म्हणजे ड्रॅगन अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यात सामील होणे. सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर, अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेला घेऊन जाणारे ड्रॅगन अंतराळयान गुरुवारी, २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता आयएसएसवर डॉक करेल. मोहिमेतील चार सदस्य आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सुमारे १४ दिवस राहतील आणि या काळात ते ६० प्रयोग करतील.

Web Title: Nasa Axiom Mission 4 Shubhanshu Shukla spacecraft left for the space station his mother became emotional