शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Narmada River ST Bus Accident: मध्य प्रदेशातील धार इथे झालेली बस दुर्घटना भीषण; नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 17:31 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली- मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. मध्य प्रदेशातील धार इथे झालेली बस दुर्घटना भीषण आहे. ज्यांनी आप्त गमावले त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. बचावकार्य सुरु आहे आणि स्थानिक प्रशासन दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत करत आहेत. बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.

१३ मृतांपैकी ७ जणांची ओळख पटली आहे. यापैकी चार जण हे महाराष्ट्रातील अकोला आणि अमळनेरचे आहेत. अद्याप काही प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १५ जण वाचले आहेत. यापैकी ५-७ जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. एसटी प्रशासन, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी ०९५५५८९९०९१ तर जळगाव जि. का. नियंत्रण कक्ष ०२५७२२२३१८०, ०२५७२२१७१९३ असे हे क्रमांक आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र