शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नरेश अग्रवाल यांच्या जाण्याने नुकसान नाही उलट फायदा होईल : मुलायम सिंह यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 19:07 IST

नरेश अग्रवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या अग्रवाल यांनी काल(दि. 13) भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपाचं सदस्यत्व घेतलं. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी अग्रवाल यांच्या भाजपाप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. नरेश ...

नरेश अग्रवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या अग्रवाल यांनी काल(दि. 13) भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपाचं सदस्यत्व घेतलं. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी अग्रवाल यांच्या भाजपाप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. नरेश अग्रवाल यांच्या जाण्याने पक्षाचं कोणतंही नुकसान होणार नाही उलट त्यांच्या जाण्याने फायदाच होईल असं मुलायम म्हणाले आहेत.

सिनेमात नाचणा-यांसाठी माझं तिकीट कापलं - नरेश अग्रवालकाही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांची पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवार म्हणून घोषणा केली होती. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आणि अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांच्यासाठी तिकीट कापल्यामुळे अग्रवाल नाराज होते. त्यामुळे ते पक्ष सोडून भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती.   भाजपात प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी आज भाजपात प्रवेश करत आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये न राहता देशासमोर स्वतःची भूमिका ठेवता येणार नाही असं ते म्हणाले. तसंच समाजवादी पक्षाविरोधात राग व्यक्त करताना सिनेमामध्ये नाचणा-यांसाठी माझं तिकीट कापण्यात आल्याचं म्हटलं. माझा समाज आधीपासूनच भाजपासोबत होता त्यामुळे या निर्णयाने ते नक्कीच आनंदी असतील. मी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आभार मानतो असं ते म्हणाले.  अग्रवाल यांनी व्यक्त केला खेद  -जया बच्चन यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. चौफेर टीका झाल्यानंतर अग्रवाल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ''माझ्या विधानामुळे कोणापुढे कोणतीही समस्या निर्माण झाली असल्यास मी त्याबाबत खेद व्यक्त करतो. समाजवादी पार्टीला मला तिकीट देणं योग्य वाटले नाही आणि त्यांनी जया यांना तिकीट दिलं. मला कोणत्याही वादामध्ये अडकायचे नाही आणि मी केलेल्या विधानाप्रकरणी खेद व्यक्त करतो''. ''माझ्या विधानाचा प्रसिद्धी माध्यमांनी वेगळ्या पद्धतीनं दाखवलं. मला कोणाला दुःख पोहोचवण्याचा हेतू नव्हता. मी माझे शब्द मागे घेतो'',असे पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :Naresh Agrawalनरेश अग्रवालMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा