शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

Narendra Modi: देशाला लुटणाऱ्यांकडून परत घ्यायची हीच ती वेळ; लाल किल्ल्यावरुन PM मोदींचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 09:38 IST

Narendra Modi: आतापर्यंत भारताने जे ठरवले, ते करून दाखवले. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांनी पाच संकल्प करणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली - देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून देशवासीयांना संबोधित केले. भारताची विविधता हीच भारताची खरी ताकद आहे. भारत ही लोकशाहीची जन्मभूमी आहे. लोकशाही हेच भारताचे खरे सामर्थ्य आहे. देशातील सामूहिक चेतना हीच देशाची ऊर्जा आहे. देशासमोर येणाऱ्या कोणत्याही संकटाना भारत देश पूर्ण ताकदीने सामोरे गेला. मात्र, आता देशासमोर आणखी दोन समस्या आहेत, असे म्हणत मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर प्रहार केला. 

आतापर्यंत भारताने जे ठरवले, ते करून दाखवले. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांनी पाच संकल्प करणे आवश्यक आहे. या संकल्पातून पुन्हा एक बलसागर भारत घडवायचा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन म्हटले. तसेच, देशातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर प्रहार करताना त्यांनी भ्रष्टाचारांना कुठलाही थारा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. एखाद्या भ्रष्टाचारी व्यक्तीचा तपास होतो, त्याच्यावर कारवाई केली जाते. त्याला तुरुंगात टाकले जाते, त्यानंतर न्यायालयाकडूनही त्याला दोषी ठरविण्यात येते. तरीही काहीजण या भ्रष्टाचारी लोकांचं समर्थन करतात, असे म्हणत एकप्रकारे मोदींनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला. तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाईचं समर्थनच केलं आहे. देशाला लुटून खाणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांकडून आता लुटलेला माल परत घेण्याची वेळ आलीय, असे म्हणत मोदींनी लाल किल्ल्यावरुन पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे.   देशासमोर सर्वात मोठ्या दोन समस्या आहेत. त्या म्हणजे भ्रष्टाचार आणि घराणेशाही. या दोन्ही समस्यांना आपण संपवून टाकायचं आहे. ज्यांनी देशाला लुटून खाल्लंय, त्यांच्याकडून आता परत घ्यायची वेळ आली आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी केंद्रीय संस्थांकडून होत असलेल्या कारवाईचं अप्रत्यक्षपणे समर्थनच केलं आहे. तसेच, देशातील राजकारणात असलेल्या घराणेशाहीवर हल्लाबोलही केला. मोदींनी कुठल्याही राजकीय घराण्याचं नाव न घेता, घराणेशाहीवर निशाणा साधला. मी माझी लेकरं, माझा भाऊ, माझ्या भावाची लेकरं, माझा पुतण्या अशा राजकारणाने देशातील राजकीय वातावरण बिघडल्याचं मोदींनी म्हटलं. त्यामुळे, देशवासीयांना या घराणेशाहीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवं, असेही ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदींचे पंचप्राण संकल्प

पंतप्रधान मोदींनी पहिला संकल्प सांगितला इप्सित भारत घडवण्याचा. दुसरा संकल्प म्हणजे, गुलामीचा एकही अंश भारतातील कोणत्याही भागात नाही. तसेच यापुढेही तो राहता कामा नये. शेकडो वर्षातील गुलामीला नष्ट करायची आहे. तिसरा संकल्प म्हणजे आपल्याला आपल्या वारसा जपायचा आहे. आपल्या वारसावर आपल्याला गर्व असायला हवा. चौथा संकल्प एकतेचा आहे. पाचवा संकल्प हा नागरिकांच्या कर्तव्यांचा आहे. यामध्ये अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशाता प्रत्येक नागरिक येतो, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. पुढील २५ वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली

महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे. प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली. कोरोनाच्या काळात भारताने हार मानली नाही. स्वांतत्र्याच्या दीर्घ कालखंडानंतरही भारताने आपला प्रभाव कायम ठेवला. देशासमोर अन्नाच्या कमतरतेपासून ते कोरोनापर्यंत अनेक संकटे आली. देशाला मोठ्या युद्धांना सामोरे जावे लागले. मात्र, देशाने कधीही पराभव स्वीकारला नाही. देश सर्व संकटांना सामर्थ्याने आणि ताकदीने सामोरा गेला, असे पंतप्रधान म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्लाCorruptionभ्रष्टाचारIndiaभारत