अजमेर शरीफ दर्ग्यात जावून मोदींसाठीचं नवस पूर्ण करणार वर्गमित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 13:16 IST2019-05-24T13:13:48+5:302019-05-24T13:16:57+5:30
मोदी यांना उत्तम आरोग्य आणि यश मिळावे यासाठी आपण रोजा ठेवला आहे. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असून देवाने माझी पार्थना मान्य केल्याचे पठान यांनी सांगितले.

अजमेर शरीफ दर्ग्यात जावून मोदींसाठीचं नवस पूर्ण करणार वर्गमित्र
अहमदाबाद - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपप्रणीत एनडीएने लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले. संपूर्ण देशात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्याचवेळी मोदींचे वर्गमित्र वाडनगरमधील जासूद पटेल (७०) हे देखील आनंदी झाले आहे. एवढच नव्हे तर मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे यासाठीचा नवस पूर्ण करण्यासाठी जासूद सज्ज झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आनंदी झालेले पठान प्रार्थना मान्य झाल्याबद्दल अजमेर शरीफ दर्ग्यात जावून देवाचे आभार मानणार आहेत. मोदींना उत्तम आरोग्य आणि यश मिळावे यासाठी आपण रोजा ठेवला आहे. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असून देवाने माझी पार्थना मान्य केल्याचे पठान यांनी सांगितले. पठान आणि मोदी पहिली ते अकरावी एकत्र शिकत होते.
नरेंद्र मोदी देशाला मजबूत बनविण्यासाठी काम करत आहेत. ते देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतील. तसेच देशातील उद्योगांना प्रोत्साहन देतील अशी आशा पठान व्यक्त केली. पठान यांच्या व्यतिरिक्त मोदींचे आणखी एक वर्गमित्र असलेले नागजी देसाई यांनी हटकेश्वर मंदिरात मोदींच्या यशाबद्दल यज्ञ केला. देसाई यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत ८० किलो मिठाई वाटली होती.
नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून वाडनगरचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे येथील लोकांनी सांगितले. तसेच येथे महाविद्यालय, रुग्णालयांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाल्याचे सांगण्यात आले.