मोदींना सद्बुद्धी मिळो, गोपालदास यांच्याकडून नरेंद्र मोदी लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 08:37 IST2018-10-08T08:31:08+5:302018-10-08T08:37:38+5:30

भाजप सरकारकडून राम मंदिराबाबत नेहमीच चर्चा केली जाते. निवडणूक काळात ही चर्चा अधिक जोर लावून करण्यात येते आहे.

Narendra Modi's goal from God-God, Modi, Gopal Das | मोदींना सद्बुद्धी मिळो, गोपालदास यांच्याकडून नरेंद्र मोदी लक्ष्य

मोदींना सद्बुद्धी मिळो, गोपालदास यांच्याकडून नरेंद्र मोदी लक्ष्य

नवी दिल्ली - अयोध्या रामजन्मभूमी न्यास चे अध्यक्ष नृत्य गोपालदास यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. अयोध्येला भेट देण्यासाठी मोदींना सद्बुद्धी मिळो, असे म्हणत गोपालदास यांनी मोदींना अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच जर मोदींनी देवाचं काम केलं तरच ते पुन्हा सत्तेत येतील, अन्यथा त्यांचा पराभव होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

भाजप सरकारकडून राम मंदिराबाबत नेहमीच चर्चा केली जाते. निवडणूक काळात ही चर्चा अधिक जोर लावून करण्यात येते आहे. त्यामुळे जनतेलाही भाजप सरकारकडून राम मंदिर उभारण्याबाबत मोठी आशा आहे. तर, गोपालदास यांनीही लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची अपेक्षा केली आहे. सध्या, मोदी-योगी सरकार बहुमतात आहे, त्यामुळे लवकरच राम मंदिर उभे राहिलं पाहिजे. केंद्राने विशेषाधिकाराचा वापर करुन राम मंदिर उभारावे, अशी मागणीही गोपालदास यांनी केली. तसेच गोपालदास यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे देवासंदर्भात चर्चा करत आहेत, त्यामुळे त्यांचे आभार मानले आहेत. 

 

Web Title: Narendra Modi's goal from God-God, Modi, Gopal Das