शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Delhi Election 2020 : नरेंद्र मोदी आजपासून प्रचारात उतरणार, दिल्ली विधानसभेचे चित्र बदलणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 11:57 AM

दिल्लीत सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांय्या नेतृत्वाखालील आपने मोठे आव्हान उभे केल्याने या निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात जोर लावावा लागत आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. दिल्लीतील सत्ता हस्तगत करण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये चुरस दिसून येत आहे. दिल्लीत सत्तेवर असलेल्या आपने मोठे आव्हान उभे केल्याने या निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात जोर लावावा लागत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता भाजपाकडून प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. मोदी आज आणि उद्या भाजपासाठी प्रचारसभा घेणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. मात्र आता भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. मोदींनी प्रचार सुरू केल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलेल अशी भाजपाच्या नेत्यांना अपेक्षा आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी भाजपाने आज दिल्लीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहीराती दिल्या असून, त्यामध्ये मोदींचा उल्लेख जननायक असा करण्यात आला आहे. मात्र मोदींच्या सभांमुळे केजरीवाल यांचा प्रभाव खरोखरच कमी होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण 2015 मध्ये देखील नरेंद्र मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी जोरदार प्रचार केला होता. मात्र त्यावेळी त्याचा कुठलाही फायदा भाजपाला झाला नव्हता. उलट 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्षाने दिल्लीत सरकार स्थापन केले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील पहिली सभा आज पूर्व दिल्लीमधील कडकडडूमा येथील सीबीडी ग्राऊंड परिसरात आयोजित होणार आहे. या सभेला भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीतील वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून मोदी हेलिकॉप्टरने सभास्थळी उपस्थित राहणार आहेत.  मोदींच्या या सभेचा प्रभाव उत्तर पूर्व दिल्लीतील 20 विधानसभा मतदारसंघांवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Delhi Election 2020 : केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने पाळले नाही: चंद्रकांत पाटील

Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल!

केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध जोडल्यानं आपचे खासदार संतापले; म्हणाले...

Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखलदरम्यान, नरेंद्र मोदींची दुसरी सभा मंगळवारी द्वारका येथे होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार गुरुवारी थांबणार आहे. तत्पूर्वी शेवटच्या चार दिवसांमध्ये भाजपाकडून आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्यात येण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल