Narendra Modi: नवीन मंत्री करण्यासाठी काहींना हटवावे लागतेय, पंतप्रधान ३ जुलै रोजी सांगणार कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 12:53 IST2023-07-01T12:45:39+5:302023-07-01T12:53:34+5:30

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी मंत्री परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंतप्रधान केंद्रीय मंत्र्यांना २०२४चा रोडमॅप देऊन मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या राजकीय अपरिहार्यतेशी जोडणार आहेत.

Narendra Modi: Some have to be removed to make new ministers, PM to explain why on July 3 | Narendra Modi: नवीन मंत्री करण्यासाठी काहींना हटवावे लागतेय, पंतप्रधान ३ जुलै रोजी सांगणार कारण 

Narendra Modi: नवीन मंत्री करण्यासाठी काहींना हटवावे लागतेय, पंतप्रधान ३ जुलै रोजी सांगणार कारण 

- संजय शर्मा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी मंत्री परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंतप्रधान केंद्रीय मंत्र्यांना २०२४चा रोडमॅप देऊन मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या राजकीय अपरिहार्यतेशी जोडणार आहेत.

सर्व मंत्र्यांनी चांगले काम केले आहे. परंतु, राजकीय अपरिहार्यतेमुळे - मंत्रिमंडळातील चेहरे बदलावे लागतात. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे काही जणांना हटवावे लागू शकते. हटविण्यात आलेल्या मंत्र्यांनी नाराज होऊ नये. ही एक राजकीय प्रक्रिया आहे, असे पंतप्रधान सांगणार आहेत.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या अंतिम फेरबदलापूर्वी मोदी यांनी ३ जुलैला दुपारी तीन वाजता मंत्री परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर मोदी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असल्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. मोदी मंत्रिमंडळातील सुमारे १२ मंत्र्यांना हटवले जाऊ शकते. त्यामुळे बैठकीचे महत्त्व वाढले आहे.

काय देणार गुरुमंत्र
आजवर मंत्री परिषदेच्या जेवढ्या बैठका झाल्या, त्यात महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण संबंधित मंत्रालयाच्या मंत्र्यांकडून केले जात होते, ते सादरीकरण पाहून पंतप्रधान त्यांना सल्ला देत होते व इतर मंत्रालयांनाही त्याचप्रकारे सादरीकरणावर काम करण्याचे निर्देश देत होते, परंतु, तीन जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्र्यांना लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी गरीब, शोषित, वंचित व मागास वर्गामध्ये जाऊन केंद्र सरकारच्या योजनांची त्यांना माहिती देण्याचा गुरुमंत्र देणार आहेत.

 

Web Title: Narendra Modi: Some have to be removed to make new ministers, PM to explain why on July 3