शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

"५ वर्षात ५ पंतप्रधान, पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव…", मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा फॉर्म्युला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:22 AM

Lok Sabha Election 2024 : जर इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधानपदासाठी निवड कशी होईल, याबाबत नरेंद्र मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहेत. मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेससह विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी जर इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधानपदासाठी निवड कशी होईल, याबाबत नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, काँग्रेसने देशातील जनतेची संपत्ती हिसकावण्याची तयारी सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय, कर्नाटकातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही नरेंद्र मोदींनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदी म्हणाले, "इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे की, इंडिया आघाडी एक वर्ष एक पीएम फॉर्म्युला तयार करत आहे, असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आले आहे. म्हणजे एक वर्ष एक पंतप्रधान, दुसऱ्या वर्षी दुसरा पंतप्रधान, तिसऱ्या वर्षी तिसरा पंतप्रधान चौथ्या वर्षी वर्षाचे चौथा पंतप्रधान आणि पाचव्या वर्षी पाचवा पंतप्रधान. अशा प्रकारे ते पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव करण्यात व्यस्त आहेत."

काँग्रेसचा धोकादायक छुपा अजेंडा आता उघडपणे समोर आला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत आहे. त्यांनी सामाजिक न्यायाची मूलभूत भावनेची हत्या केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, काँग्रेस पक्ष दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचा द्वेष करतो. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला सर्वात मोठा विरोध बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. काँग्रेस देशाला अधोगतीच्या मार्गावर कशी नेत आहे, हे बाबासाहेबांनी त्यावेळी पाहिले होते, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

कर्नाटकात ओबीसींना आरक्षण मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे. ओबीसी कोट्यातील आरक्षणाचा वाटा हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसने राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसी केले. काँग्रेसची ही कृती संपूर्ण देशातील ओबीसी समाजासाठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात धर्मावर आधारित आरक्षणावर सतत बोलत असते. तेलंगणातील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिमांना आरक्षण मिळेल, असे नाव घेऊन सांगितले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसकडून जनतेची संपत्ती हिसकावण्याची तयारी - नरेंद्र  मोदी  याचबरोबर, काँग्रेस आपली व्होट बँक खूश करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. आता काँग्रेसने देशातील जनतेची संपत्ती हिसकावून आपली व्होट बँक मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. जर कोणाकडे एकापेक्षा जास्त कार, मोटारसायकल, घर असेल, तर त्या काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सरकार जप्त करेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४