शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानाच्या ताकदीचा वापर, नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 06:43 IST

Narendra Modi News: निवडणूक आयोगाने जनशक्तीला अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग केला आहे आणि निष्पक्ष मतदान प्रक्रियेसाठी वचनबद्धतादेखील दर्शविली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

 नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने जनशक्तीला अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग केला आहे आणि निष्पक्ष मतदान प्रक्रियेसाठी वचनबद्धतादेखील दर्शविली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. २५ जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनापूर्वी आणि भाजपच्या बाजूने कथित पक्षपातीपणाबद्दल विरोधकांकडून सतत टीका होत असताना त्यांनी आयोगाचे कौतुक केले.

निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारीला झाली होती. हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान म्हणाले की, मी आयोगाचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी वेळोवेळी आमची मतदान प्रक्रिया आधुनिक आणि मजबूत केली आहे. विरोधी पक्ष निवडणूक प्रक्रियेतील काही पैलू आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ही टिप्पणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी संविधान सभेतील चर्चेदरम्यानची ऑडिओ क्लिपही ऐकविली. 

लोकशाही बळकट आणि समृद्ध झाली लोकशाही प्रक्रियेचा एक भाग बनून मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा १९५१-५२ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा काही लोकांना अशी शंका व्यक्त केली होती की, देशाची लोकशाही टिकेल की नाही.मात्र, आपल्या लोकशाहीने सर्व शंका खोट्या ठरविल्या. भारत ही लोकशाहीची जननी आहे. गेल्या काही दशकांत देशाची लोकशाही बळकट आणि समृद्ध झाली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग