शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मी नरेंद्र दामोदरदास मोदी..., पंतप्रधानपदाची घेतली तिसऱ्यांदा शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 07:22 IST

Narendra Modi Oath Ceremony :लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत बहुमत मिळविणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला.

 नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत बहुमत मिळविणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासह एकूण ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेतली.

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपप्रणीत एनडीए आघाडीने बहुमत प्राप्त केले. त्यानंतर झालेल्या एनडीए संसदीय नेत्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार रविवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा शपथविधी पार पडला. सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

महाराष्ट्राचा टक्का घसरलागेल्यावेळी महाराष्ट्रातील ८ मंत्री होते. त्यापैकी नारायण राणे, डॉ. भागवत कराड यांना यंदा स्थान मिळाले नाही. रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील यांचा पराभव झाल्याने त्यांचा विचार झाला नाही. यंदा राज्यातील ६ जणांचाच समावेश झाला आहे.

कॅबिनेटच्या मागणीमुळे प्रफुल्ल पटेल वेटिंगवरज्येष्ठतेनुसार प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्रिपदासाठी पात्र होते. शिंदेसेनेचे सात खासदार असताना प्रताप जाधव यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपद दिले. एकच खासदार असलेल्या अजित पवार गटाला कॅबिनेटपद दिल्यास नाराजीची शक्यता होती. त्यामुळे पटेल यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा