Rahul Gandhi : "तुम्ही माझ्या बहिणीला विचारा, जर मी काही करायचे ठरवले तर..." नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:14 IST2025-07-26T14:07:37+5:302025-07-26T14:14:14+5:30
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी परिषदेत पंतप्रधान मोदींवरजोरदार टीका केली.

Rahul Gandhi : "तुम्ही माझ्या बहिणीला विचारा, जर मी काही करायचे ठरवले तर..." नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
Rahul Gandhi : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल २५ जुलै रोजी दिल्लीत झालेल्या 'ओबीसी पार्टनरशिप जस्टिस कॉन्फरन्स'मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
यावेळी राहुल गांधी यांनी राजकारणातील खरी समस्या काय आहे हे माहित आहे का? असा सवाल केला. यावर एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन उत्तर दिले. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे मोठी समस्या नाहीत. माध्यमांनी त्यांना फक्त वर चढवून ठेवले आहे. मी त्यांना दोनवेळा भेटलो आहे, त्यांच्यासोबत एका खोलीत बसलो आहे. हा फक्त एक दिखावा आहे, त्यात काहीही तथ्य नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
'ओबीसी' वरुन टीका
"नरेंद्र मोदी 'हिंदू भारत' म्हणतात, तर ५० टक्के हिंदू ओबीसी आहेत. जर ते हिंदू भारत आहे तर मीडिया आणि कॉर्पोरेट क्षेत्रात ओबीसी का नाहीत, मोठ्या नेत्यांच्या यादीत ओबीसी का नाहीत?, असा सवाल मोदींनी केला.
"त्यांच्या व्यवस्थेत ओबीसी का नाहीत. म्हणूनच आम्ही म्हटले आहे की जिथे काँग्रेसचे सरकार असेल तिथे आम्ही जातीय जनगणना करू, जेणेकरून आम्हाला कळेल की देशात ओबीसी वर्गातील लोकांचा किती सहभाग आणि वाटा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.
प्रत्येक भारतीयाला आदर मिळाला पाहिजे
राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही माझी बहिण प्रियांका यांना विचारा की, जर राहुल यांनी काही काम करायचे ठरवले असेल तर ते काम करतील की नाही? मी ते सोडणार नाही. जातीय जनगणना हे माझे पहिले पाऊल आहे, माझे ध्येय आहे की तुमच्या कामाला भारतात आदर आणि सहभाग मिळावा.