शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी स्वत:च्या हिम्मतीवर गुजरात जिंका - पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:45 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर या मुद्यावरुन राजकारण तापू लागले आहे.

ठळक मुद्देआम्ही गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गुजरातमध्ये एका प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस पाकिस्तानच्या मदतीने निवडणूक लढत असल्याचा आरोप केला होता.

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर या मुद्यावरुन राजकारण तापू लागले आहे. पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावताना गुजरात निवडणुकीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

भारताने आपल्या राजकीय लढाईत पाकिस्तानला खेचू नये. अशी कटकारस्थान करण्याऐवजी स्वत:च्या हिम्मतीवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करावा. आम्ही गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मह फैसल यांनी टि्वटमध्ये म्हटले  आहे. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गुजरातमध्ये एका प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस पाकिस्तानच्या मदतीने निवडणूक लढत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि उच्चायुक्तांसोबत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली असा आरोप केला होता. त्यानंतर या सर्व राजकारणाला सुरुवात झाली. 

काँग्रेसने लागलीच पंतप्रधानांचा हा आरोप फेटाळून लावला होता. देशाच्या सर्वोच्चपदावर बसून पंतप्रधान मोदी निराधार आरोप करत आहेत. चिंता आणि हताशेमधून ते असे आरोप करत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले होते. पण आता जी माहिती समोर आलीय त्यानुसार मोदींनी केलेल्या आरोपात तथ्य असून 6 डिसेंबरला मणिशंकर अय्यर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अशी बैठक पार पडली. 

या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमहू कसुरी, माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह तसेच पाकिस्तानातील भारतीय दूतावासात काम केलेले काही अधिकारी उपस्थित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपरराष्ट्रपती हमीद अन्सारीही या कार्यक्रमाल उपस्थित होते. लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी  या बैठकीला उपस्थित असल्याचे मान्य केले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017