नरेंद्र मोदी हे हेरगिरी करणारे ‘बिग बॉस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:06 AM2018-03-27T06:06:57+5:302018-03-27T06:06:57+5:30

डेटा शेअर करण्यावरून वाद रंगत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी हे हेरगिरी करणारे बिग बॉस आहेत

Narendra Modi is the big boss' spy! | नरेंद्र मोदी हे हेरगिरी करणारे ‘बिग बॉस’!

नरेंद्र मोदी हे हेरगिरी करणारे ‘बिग बॉस’!

Next

शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : डेटा शेअर करण्यावरून वाद रंगत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी हे हेरगिरी करणारे बिग बॉस आहेत, अशा शब्दांत हल्लाबोल केला. त्यानंतर, काँग्रेस आपल्या अ‍ॅपवरील लोकांची माहिती सिंगापूरला देत असल्याचा आरोप होताच काँग्रेसने प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप हटविले.
राहुल म्हणाले की, पंतप्रधानांच्या अधिकृत अ‍ॅपवरून युजर्सच्या सहमतीशिवाय डेटा शेअर करण्यात येत आहे. ‘नमो’ अ‍ॅप युजर्सच्या आॅडिओ, व्हिडीओची माहिती घेत आहे. जीपीएसद्वारो पत्ता, ठिकाणही जाणून घेत आहे. त्यांनी १३ लाख एनसीसी विद्यार्थ्यांना अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले असून, मोदी पदाचा दुरुपयोग करत आहेत. पंतप्रधान भारतीयांशी संवाद करू इच्छितात, याबाबत काहीच हरकत नाही, पण त्यासाठी अधिकृत पीएमओ अ‍ॅपचा उपयोग का? ही आकडेवारी भारताची आहे.

इराणी यांचा पलटवार
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पलटवार करताना म्हणाल्या की, राहुल
जे सांगतात, त्याच्याविरुद्ध त्यांची टीम काम करत आहे. ‘नमो’ अ‍ॅप डिलीट करण्याऐवजी काँग्रेसने स्वत:चे अ‍ॅपच डिलीट केले. छोटा भीमही जाणतो की, अ‍ॅपवर सामान्य स्वरूपात मागण्यात आलेल्या परवानगीचा अर्थ हेरगिरी होत नाही. भाजपाच्या आयटी विभागाचे अमित मालवीय म्हणाले की, काँग्रेसच्या अ‍ॅपचा डेटा सिंगापूरमध्ये शेअर केला जात आहे.
दोघांचे अ‍ॅप असुरक्षित
‘नमो’ अ‍ॅप यूजर्सच्या संमतीविना त्यांची माहिती अमेरिकन कंपनीला देत असल्याचा दावा फ्रेंच हॅकर एलियट एल्डरसन यांनी केला आहे. काँग्रेसच्या अ‍ॅपवरील माहिती सुरक्षित नाही, असे म्हटले होते.

Web Title: Narendra Modi is the big boss' spy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.