आम्ही कुणाला छेडत नाही आणि छेडणाऱ्याला सोडतही नाही - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 16:06 IST2019-01-28T16:02:50+5:302019-01-28T16:06:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत आयोजित एनसीसी रॅलीमध्ये गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले.

आम्ही कुणाला छेडत नाही आणि छेडणाऱ्याला सोडतही नाही - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत आयोजित एनसीसी रॅलीमध्ये गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले. त्यानंतर उपस्थित एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना मोदी म्हणले, ''मी तुम्हाला संबोधित करण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा माझ्या मनात भूतकाळातील आठवती ताजा होतात. हा दिवस जो आज तुम्ही अनुभवत आहात, तेच क्षण मलाही अनुभवता आले होते.'' यावेळी मोदींनी नामोल्लेख न करता पाकिस्तानला इशारा दिला. आपल्या लष्करानेही आता शत्रूंना स्पष्ट संदेश दिलेला आहे. आम्ही मुद्दामहून कुणाच्या वाटेला जात नाही, पण कुणी आम्हाला छेडले तर त्याला सोडतही नाही, असाच संदेश लष्कराने दिला आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
मोदींनी संबोधनादरम्यान सांगितले की, आपल्या लष्कराने स्पष्ट संदेश दिला आहे. आम्ही कुणाला मुद्दामहून छेडत नाही आणि कुणी आम्हाला छेडले तर त्याला सोडतही नाही. आम्ही शांततेचे कट्टर पुरस्कर्ते आहोत. पण देशाच्या रक्षणासाठी कुठलेही पाऊल उचलण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. म्हणूनच गेल्या चार वर्षांच रक्षण आणि संरक्षणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.''
''आजच्या घडीला भारत हा जगातील त्या मोजक्या देशांपैकी एक देश आहे ज्याच्याकडे जमीन, आकाश आणि पाण्यामधून मारा करता येण्यास सक्षम असलेली अण्वस्त्रे आहेत. तसेच अनेक दशकांपासून खोळंबलेले विमान आणि आधुनिक तोफांसंबंधीचे करार प्रत्यक्षात आणले गेले आहेत. देशामध्येही क्षेपणास्रापासून टँक, दारुगोळा आणि हेलिकॉप्टर बनवले जात आहेत. येत्या काळातही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असेल असा प्रत्येक मोठा आणि कठोर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मी येथे उपस्थित असलेल्या माझ्या युवा सहकाऱ्यांना देतो,'' असेही मोदींनी यावेळी सांगितले.
Saluting India's Yuva Shakti. Addressing the NCC rally. Watch. https://t.co/Mukpzwyko0
— Narendra Modi (@narendramodi) January 28, 2019
यावेळी एनसीसी कॅडेट्सच्या कार्याची मोदींनी प्रशंसाही केली, ''तुम्ही येथे देशातील विविध भागातून आला आहात. मला तुम्ही घेत असलेल्या परिश्रमांची जाणीव आहे. हेच परिश्रम आपल्याला सक्षम बनवतील,'' असे मोदींनी सांगितले.