शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Narendra Giri Death: खुलासा! आत्महत्येपूर्वी महंत नरेंद्र गिरी यांनी केला होता BJP नेत्याला फोन; संशय बळावला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 2:10 PM

पोलिसांच्या तपासात या दोन्ही नेत्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. महंत यांनी आत्महत्येपूर्वी ६ नंबरवर कॉल केले होते.

ठळक मुद्देमहंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली त्याठिकाणी ६ पानांची सुसाईड नोट आढळली आहे. मागील काही दिवसांपासून हनुमान मंदिरात मिळणाऱ्या देणग्यांवरुन महंत आणि या दोघांमध्ये वाद सुरु होताकाही लोकांनी माझ्यावर आरोप करत मला अपमानित केले त्यामुळे महंत नरेंद्र गिरी खूप दुखी होते.

प्रयागराज - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्या Narendra Giri Death Case) प्रकरणाचे विविध पैलू आता सर्वांसमोर येत आहेत. आत्महत्येपूर्वी महंत नरेंद्र गिरी यांनी एक स्थानिक भाजपा नेते अनुराग संत(BJP Anuraj Sant) यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. त्याशिवाय अन्य एका भाजपा नेते संदीप तिवारी यांच्याशीही बोलणं झालं होतं. अनुराग संत आणि संदीप तिवारी दोघंही महंतांच्या निकटवर्तीय होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांच्या तपासात या दोन्ही नेत्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. महंत यांनी आत्महत्येपूर्वी ६ नंबरवर कॉल केले होते. त्यातील एक हरिद्वारचा आहे. सध्या यासाठी पोलिसांचे पथक हरिद्वारला पाठवलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली त्याठिकाणी ६ पानांची सुसाईड नोट आढळली आहे. त्यात मठ आणि आखाडाचे उत्तराधिकारी यांची नावं लिहिली आहेत. या प्रकरणात महंत यांच्या जवळचे आनंद गिरी यांच्याविरोधात FIR नोंदवत हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून हनुमान मंदिरात मिळणाऱ्या देणग्यांवरुन महंत आणि या दोघांमध्ये वाद सुरु होता. महंत गिरी यांच्या मृत्यूची बातमी कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु त्यांना मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. महंतांच्या मृतदेहाशेजारी ६ पानी सुसाईड नोट आढळली. त्यासोबत सल्फासच्या गोळ्या सापडल्या. सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा यांच्याविरोधात छळ केल्याचा आरोप आहे. संपूर्ण आयुष्यात कधीही अंगाला काळा डाग लागू दिला नाही. पण काही लोकांनी माझ्यावर आरोप करत मला अपमानित केले त्यामुळे महंत नरेंद्र गिरी खूप दुखी होते.

बऱ्याच काळापासून तणावाखाली होते.

महंत नरेंद्र गिरी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर केले होते. पण, त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता. पण, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू होता, अशीही माहिती मिळत आहे.

शिवसेनेकडून सीबीआय तपासाची मागणी

नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं ते रहस्यमय आहे. नरेंद्र गिरी महाराजांचा मृत्यू हा रहस्यमय असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी. कारण, ते मजबूत मनाचे होते, ते आत्महत्या करतील असे वाटत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Policeपोलिस