इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:19 IST2025-07-16T19:17:03+5:302025-07-16T19:19:52+5:30
canada girl indian boy love story: घरच्यांनी मुलगी बेपत्ता झाल्यात पोलिसांत दिलेली तक्रार, पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधलं...

इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
उत्तराखंडच्या नैनितालमध्ये एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. कॅनाडामध्ये राहणारी एक तरुणी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका मुलाला भेटली. दोघांमध्ये छान मैत्री झाली. इतकेच नव्हे तर त्यांचं एकमेकांवर प्रेमही जडलं. दोघांनी लग्नं करायचं ठरवलं. सर्वात आधी तरुणी कॅनडातून १२,५४० किमी प्रवास करू हैदराबादला आली. तिथे ती काकाच्या घरी आली. तेथून मग लपूनछपून ती १७०१ किमी प्रवास करून रामनगरला गेली. दुसरीकडे, कुटुंबातील सदस्यांना वाटले की त्यांच्या मुलीसोबत काहीतरी अनुचित घडले आहे. त्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर जेव्हा तिचे कुटुंबीयही तेथे आले तेव्हा त्यांना धक्काच बसला.
नेमका काय घडला प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही इंस्टाग्रामवर मित्र बनले. दोघेही तीन वर्षांपासून इंस्टाग्रामवर एकमेकांशी बोलत होते. हळूहळू मैत्री अधिक घट्ट झाली आणि ती प्रेमात पडली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. असे सांगितले जाते की, ११ जुलै रोजी मुलगी तिच्या कुटुंबाला सांगून कॅनडाहून भारतात पोहोचली. मुलीचे कुटुंब आणि पोलिस मुलीचा शोध घेतघेत तिच्या मागे रामनगरपर्यंत आले. पण मुलगी घरी जाण्यास तयार झाली नाही. नंतर तिने तिच्या प्रियकराशी मंदिरात लग्न केले.
बेपत्ता झाल्याची केली तक्रार
मुलगी प्रथम तिच्या काकाच्या घरी हैदराबादला पोहोचली, नंतर रात्री ती तिच्या काकाच्या घरातून निघून गेली. मुलीचे कुटुंब मूळचे हैदराबादचे आहे, परंतु अनेक वर्षांपूर्वी तिचे कुटुंब कॅनडाला स्थलांतरित झाले आणि त्यांनी तिथले नागरिकत्व घेतले. मुलगी अचानक काकांच्या घरातून गायब झाल्याने सर्वांनाच काळजी वाटली. काकांनी त्यांच्या भाचीची बेपत्ता झाल्याची तक्रार हैदराबादमध्येच नोंदवली. दरम्यान, मुलीचे पालकही कॅनडाहून हैदराबादला पोहोचले. हैदराबाद पोलिसांनी मुलीचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले, तेव्हा ते नैनिताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये आढळले. मोबाईल लोकेशनच्या आधारे हैदराबाद पोलिस आणि मुलीचे कुटुंब रामनगरला पोहोचले.
दोघांनीही मंदिरात लग्न केले...
रामनगर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आणि मुलीचा शोध घेण्यात आला. पोलिसांना मुलगी सापडली. यानंतर, मुलगी आणि मुलाला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले, जिथे मुलीच्या कुटुंबाने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला त्यांच्यासोबत येण्यास सांगितले, परंतु मुलगी कोणत्याही परिस्थितीत तिच्या कुटुंबासोबत जाण्यास तयार नव्हती. मुलीने सांगितले की ती तिच्या प्रियकराशीच लग्न करेल. यादरम्यान, पोलिस ठाण्यात बराच गोंधळ झाला. शेवटी, मुलीच्या कुटुंबाने हार मानली आणि परत गेले. यानंतर, मुलीने तिच्या प्रियकराशी मंदिरात लग्न केले.