शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

लखनौमधील हत्याकांडाचे नागपूर कनेक्शन : एटीएसकडून एक संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:16 PM

उत्तरप्रदेशमधील हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या लखनौमधील हत्याकांडाचे गुजरातनंतर नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरातील एका व्यक्तीची स्थानिक एटीएसच्या कार्यालयात रात्रीउशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

ठळक मुद्देउपराजधानीत खळबळ, रात्रीपर्यंत सुरू होती चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तरप्रदेशमधील हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या लखनौमधील हत्याकांडाचे गुजरातनंतर नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरातील एका व्यक्तीची स्थानिक एटीएसच्या कार्यालयात रात्रीउशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र, त्याचे नाव, पत्ता सांगण्यासाठी तपास यंत्रणेतील कोणताही अधिकारी तयार नव्हता.तिवारी यांची दोन दिवसांपूर्वी लखनौमध्ये दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. तिवारींचा गळा कापून आणि गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे केवळ लखनौ, उत्तरप्रदेशच नव्हे तर देशभर खळबळ उडाली आहे. यूपी पोलीस, एटीएससह देशातील बहुतांश तपास यंत्रणा या खळबळजनक हत्याकांडाचा तपास करीत होत्या. घटनास्थळी पोलिसांना मिठाईचा एक बॉक्स सापडला होता. त्या बॉक्सवर सूरत(गुजरात)चा पत्ता होता. त्यावरून तपास यंत्रणांनी सूरतमधील त्या मिष्ठान्न भांडारातील सीसीटीव्ही फुटेज आणि लखनौमधील सीसीटीव्ही फुटेजची सांगड घालत तिवारीच्या मारेकऱ्यांची ओळख पटवली होती. या पार्श्वभूमीवर, त्यांचे कॉल डिटेल्स तपासले असता मारेकऱ्यांनी या हत्याकांडानंतर एक फोन नागपुरातही केल्याचे उघड झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर, एटीएसच्या स्थानिक पथकाने जाफरनगरातील एका संशयिताला ताब्यात घेतले. यासंबंधाने एटीएसने कमालीची गोपनीयता बाळगली आहे. त्यांनी इतरांना सोडा खुद्द शहर पोलीस आयुक्तांनाही सविस्तर माहिती देण्याचे टाळल्याचे समजते. मात्र खास सूत्रांच्या माहितीनुसार, कमलेश तिवारींच्या हत्येचे आरोपी मईनुद्दीन शेख आणि अशफाक शेखशी नागपुरातील संशयित संबंधित आहे. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू होती. विशेष म्हणजे, हत्येचा सूत्रधार रशीद पठाण, मौलाना मोहसिन शेख आणि फैजानला यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मईनुद्दीन शेख तसेच अशफाक शेख या दोघांचा शोध घेतला जात आहे. या दोघांनी सूरतमधून चाकू आणि मिठाई खरेदी केली होती. तेथून त्यांनी लखनौ गाठले आणि घरी जाऊन तिवारींची हत्या केल्याचे सांगितले जाते.इसिसचे कनेक्शन?या खळबळजनक हत्याकांडात इसिसचे कनेक्शन असल्याची चर्चा आहे. कमलेश तिवारींच्या हत्येचा कट गुजरातमध्ये रचण्यात आला आणि दुसऱ्या  दोन राज्यातले सुपारी किलर या हत्याकांडासाठी वापरण्यात आल्याचे सांगितले जाते. गृहमंत्रालयाशी अत्यंत निकटचे संबंध असलेल्या उत्तरप्रदेशातील एका तरुण अधिकाऱ्या च्या देखरेखीत हा तपास सुरू आहे. नागपुरात एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे कळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि उत्सुकतेपोटी अनेकांनी एटीएस कार्यालयासमोर रात्री मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Terrorist SquadएटीएसMurderखूनnagpurनागपूर