Nagarpalika and panchayat samiti Election results : Asaduddin owaisi's party AIMIM Win on the 7 sits in Godhra. | गोध्र्यात ओवेसींचं नाणं खण-खणलं; 8 जागांवर लढली निवडणूक, 7 जागा जिंकल्या!

गोध्र्यात ओवेसींचं नाणं खण-खणलं; 8 जागांवर लढली निवडणूक, 7 जागा जिंकल्या!


गोध्रा -गुजरातमधील नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठे यश मिळाले आहे. तर काँग्रेसची कामगिरी येथेही अत्यंत वाईट झाली. मात्र, यातच ओवेसींच्या एआयएमआयएम पक्षाने गोध्रा येथे 8 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी 7 उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसचा यापूर्वीही नगरपालिका निवडणुकीत वाईट प्रकारे पराभव झाला होता. (Asaduddin owaisi's party AIMIM Win on the 7 sits in Godhra)

या निवडणुकांमध्ये एकूण 8,235 जागांसाठी भाजपने 8,161 उमेदवार, काँग्रेसने 7,778, आम आदमी पार्टी (आप)ने 2,090 उमेदवार मैदानात उतरवले होते. याशिवाय असदुद्दीन ओवैसी यांनीही या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, ओवेसींच्या एआयएमआयएमने मोडासा येथे 12 पैकी 8, गोध्रा येथे 8 पैकी 7 तर भरूच येथे 8 पैकी 1 जागांवर विजय मिळवला आहे.

नगरपालिका, जिल्हापरिषद अन् पंचायत समितीच्या निकालांवर काय म्हणाले मोदी -
गुजरातच्या ग्रामीण भागाने सर्वसंमतीने विकासावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकारच्या जनहितार्थ कामाने लोकांच्या मनात घर केले आहे. तर दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. आमचा पक्ष गुजरातमधील सर्व बंधू-भगिनींच्या प्रगतीसाठी काम करत राहिल. 

तसेच, गुजरातमधील नगरपालिका, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निकालाने आपला स्पष्ट संदेश दिला आहे. संपूर्ण राज्य विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या अजेंड्यासोबत मजबुतीने उभे आहे. मी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल गुजरातच्या जनतेला नमन करतो, असे मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nagarpalika and panchayat samiti Election results : Asaduddin owaisi's party AIMIM Win on the 7 sits in Godhra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.