शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एन. डी. तिवारींच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 09:41 IST

रोहित यांच्या नाकातून रक्त आले होते. त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन करण्यासाठी एम्समध्ये नेण्यात आले होते.

नवी दिल्ली : उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या मुलाचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी रोहित शेखर तिवारी डिफेन्स कॉलनीतील घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रोहित हे त्यांची पत्नी अपूर्वा शुक्ला आणि आई उज्ज्वला शर्मा यांच्यासोबत राहत होते. 

रोहित यांच्या नाकातून रक्त आले होते. त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन करण्यासाठी एम्समध्ये नेण्यात आले होते. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून प्राथमिक तपासात त्यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेज किंवा हृदयविराच्या झटक्याने झाला असल्याचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण समजू शकणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

रोहित तिवारी यांच्या आई उज्ज्वला यांनी सांगितले की, रोहितचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला आहे. आपल्याला कोणावरही संशय नाही. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण मी नंतर सांगेन. रोहित यांचे लग्न गेल्या वर्षीच्या मे मध्ये झाले होते. मॅक्स हॉस्पिटलमध्ये एन डी तिवारी यांच्या सर्व कुटुंबावर उपचार केले जातात. रोहितला उच्च रक्तदाब, मधुमेहसारखा कोणताही आजार नव्हता. मात्र, काही वर्षांपूर्वी ते नातेवाईकाला भेटण्यासाठी हॉस्पटलमध्ये गेले असता त्यांना चक्कर आली होती. 

मोठ्या वादानंतर मुलगा म्हणून स्वीकाररोहित याने 12 एप्रिलला एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसमध्ये सहभागी होऊन राजकीय इनिंग आजमावणार असल्याचे म्हटले होते. काही वर्षांपूर्वी एन. डी. तिवारी यांचे वयाच्या 89 व्या वर्षीचे लग्न प्रकरण गाजले होते. न्यायालयात बराच काळ चाललेल्या वादानंतर एन. डी. तिवारी यांनी रोहित हा त्यांचाच मुलगा असल्याचे मान्य केले होते. तसेच 89 व्या वर्षी त्यांनी उज्ज्वला यांच्याशी लग्नही केले होते. रोहित हे 2017 मध्ये भाजपामध्ये सहभागी झाले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एन डी तिवारी यांचे निधन झाले होते.

[8:03 AM, 4/17/2019] Sayali Shirke Lokmat Onl:

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश