अवकाशातून पडताहेत रहस्यमय वस्तू; गुजरातच्या ३ जिल्ह्यांमध्ये खळबळ, गावकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:56 PM2022-05-16T17:56:30+5:302022-05-16T17:58:04+5:30

गुजरातच्या ३ जिल्ह्यांमध्ये आढळल्या रहस्यमय वस्तू; ५ गावांमध्ये खळबळ

Mystery space debris found in three districts in Gujarat | अवकाशातून पडताहेत रहस्यमय वस्तू; गुजरातच्या ३ जिल्ह्यांमध्ये खळबळ, गावकरी चिंतेत

अवकाशातून पडताहेत रहस्यमय वस्तू; गुजरातच्या ३ जिल्ह्यांमध्ये खळबळ, गावकरी चिंतेत

googlenewsNext

गांधीनगर: गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून रहस्यमय वस्तू आढळून येत आहेत. अवकाशातून पडणाऱ्या वस्तूंमुळे अनेक गावांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ चिंतेत आहेत. अवकाशातून पडणाऱ्या वस्तूंमुळे आतापर्यंत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक फॉरेन्सिक सायन्स लॅब्जमधील तज्ज्ञ या वस्तूंचा अभ्यास करत आहेत. 

सर्वप्रथम १२ मे रोजी आणंद जिल्ह्यातील भालेज, खंभोलज आणि रामपुरा गावांमध्ये अवकाशातून काही वस्तू पडल्या. त्यानंतर १४ मे रोजी खेडा जिल्ह्यातल्या चकलासी गावात याची पुनरावृत्ती झाली. या ठिकाणी धातूचे गोळे आढळून आले. वडोदरातील सावली गावातही १४ तारखेलाच अशाच प्रकारचा गोळा आढळून आला. या गोळ्यांमुळे माणसांवर, प्राण्यांवर, वनस्पतींवर परिणाम होणार नाही ना, याचा शोध फॉरेन्सिक सायन्स विषयातील तज्ज्ञ घेत आहेत.

सावली गावात सापडलेल्या वस्तू निरीक्षणसाठी गांधीनगरमधील फॉरेन्सिक सायन्स संचलनालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती बडोदा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी दिली. जिल्ह्यातल्या तीन गावांमध्ये चेंडूसारख्या वस्तू आढळून आल्या. त्या मिश्रधातूपासून तयार करण्यात आल्या असून त्यांची घनता जास्त असल्याचं आणंदचे पोलीस अधीक्षक अजित राजीयन यांनी सांगितलं.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास आणंदमधील भलेज गावात काळ्या रंगाचा गोळा पडला. त्याचं वजन जवळपास ५ किलो आहे. त्यानंतर लगेचच खंभोलज आणि रामपुरातूनही अशीच माहिती समोर आली. ही तीन गावं १५ किलोमीटरच्या परिघात आहेत. १४ मे रोजी याच प्रकारचा गोळा आणंदमधील चकलासी गावात आवात आढळला. चकलासी गाव भलेजपासून ८ किलोमीटरवर आहे.
 

Web Title: Mystery space debris found in three districts in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.