’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:42 IST2025-12-31T19:41:09+5:302025-12-31T19:42:07+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील एका तरुणीने तिच्या समाजात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत दिलेल्या धक्कादायक माहितीमुळे खळबळ उडाली आहे. माझे नातेवाईकच माझा २०० रुपयांना सौदा करू ग्राहकांच्या हवाली करायचे.

’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती
मध्य प्रदेशमधील एका तरुणीने तिच्या समाजात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत दिलेल्या धक्कादायक माहितीमुळे खळबळ उडाली आहे. माझे नातेवाईकच माझा २०० रुपयांना सौदा करू ग्राहकांच्या हवाली करायचे. तसेच मी याविरोधात आवाज उठवला असता आपल्या समाजात ही प्रथा आहे असं सांगून मला गप्प बसवले गेले, अशी धक्कादायक माहिती न्याय मिळवण्यासाठी रतलाम येथून भोपाळ येथे पोहोचलेल्या एका २१ वर्षीय तरुणीने दिली आहे.
या तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती देताना सांगितले की, माझे नातेवाईकच माझा २०० रुपयांना सौदा करून ग्राहकांच्या हवाली करायचे. घरातील तीन बहिणींचासुद्धा असाच अनोळखी ग्राहकांसोबत सौदा केला जातो. तर माझे भाऊ आणि वडील घरात बसून मुलीच्या कमाईवर जगतात. मी विरोध केला तेव्हा आपल्या समाजामध्ये ही प्रखा आहे, असं सांगून मला गप्प बसवलं गेलं. आमच्या समाजात मुलींना असं काम करण्यासाठीच वाढवलं जातं. तसेच आमच्या गावात अशा दलदलीत अडकलेल्या हजारो तरुणी आहेत, अशी माहितीही या तरुणीने दिली.
या तरुणीने सांगितले की, केवळ २०० रुपयांसाठी माझ्या आई, वडिलांनी आणि मामाने वेश्या व्यवसायात ढकलायचे. जेव्ह मी १४ वर्षांची होती तेव्हा माझ्या हातात शाळेची पुस्तके असायला हवी होती. मात्र माझ्या नातेवाईकांनी मला वेश्या व्यवसायाच्या झंद्यात उतरवले. माझ्या घरीच ग्राहकांचं येणं जाणं होतं. माझे वडील आणि भाऊ काही काम करत नसत. संपूर्ण कुटुंब माझ्यासारख्या इतर मुलींच्या कमाईवर उदरनिर्वाह करायचं.
दरम्यान, शारीरिक आणि मानसिक शोषणामुळे हादरलेल्या या तरुणीने एकेदिवशी या दलदतीलून बाहेर पडण्याचा निश्चय केला. आपल्याला शहरात जाऊन कोचिंग करायचं आहे, असे तिने सांगितले. तेव्हा कुटुंबीयांना ती शहरात जाऊन अधिक कमाई करेल, असं वाटलं. त्या आमिषातून तिला जाऊ दिलं. याच संधीच फायदा उठवत ही तरुणी घरातून पळाली आणि तिने भोपाळ येथे धाव घेत पोलिसांकडे मदतीची याचना केली.