लोकसभेत भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी कोणाचंही नाव न घेता टीएमसीच्या एका खासदारावर सभागृहात ई-सिगारेट ओढल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणी टीएमसीचे खासदार सौगत रॉय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितलं की, भाजपा नेत्याच्या या विधानात कोणतंही तथ्य नाही.
सौगत रॉय म्हणाले, "आरोप काही नाही, सभागृहाच्या आत सिगारेट पिण्यास मनाई आहे. मात्र, सभागृहाबाहेर मोकळ्या जागेत सिगारेट पिण्यावर कोणतीही बंदी नाही. भाजपा आरोप करत आहे, पण त्यांच्याच सरकारच्या काळात दिल्लीतील प्रदूषण सर्वात जास्त आहे. ते यावर बोलत नाहीत. माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात कोणताही फरक पडणार नाही. त्यांनी दिल्लीतील प्रदूषण कमी करावं."
भाजपाचे खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनी शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सभागृहात ई-सिगारेटच्या वापराबाबत गंभीर तक्रार नोंदवली आहे. त्यांनी तक्रारीत सांगितलं की, ११ डिसेंबर २०२५ रोजी सभागृहाच्या कामकाजादरम्यान एका खासदाराला उघडपणे ई-सिगारेट वापरताना पाहिलं गेलं, जे संसदेचे नियम, आचारसंहिता आणि भारतात ई-सिगारेटवर असलेल्या पूर्ण प्रतिबंधाचे स्पष्ट उल्लंघन आहे.
पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, २०१९ च्या कायद्यानुसार ई-सिगारेटचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे, तर संसद परिसरात अशा उपकरणांचा वापर २००८ पासूनच निषिद्ध आहे. अनुराग ठाकूर यांनी या घटनेला लोकशाही संस्थांच्या प्रतिष्ठेविरुद्ध ठरवत, तात्काळ कारवाई, चौकशी आणि संबंधित खासदारावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा घटना चुकीचा संदेश देतात आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी कठोर कारवाई अनिवार्य आहे, असंही ते म्हणाले
Web Summary : TMC MP Saugata Roy refuted BJP's claim of him smoking e-cigarette in parliament. He stated smoking outside is permitted and criticized the BJP for Delhi's high pollution levels, saying his cigarette won't affect it. BJP MP Thakur complained about the incident, citing rules against e-cigarettes in parliament.
Web Summary : टीएमसी सांसद सौगत रॉय ने संसद में ई-सिगरेट पीने के भाजपा के आरोप का खंडन किया। उन्होंने कहा कि बाहर धूम्रपान की अनुमति है और दिल्ली के उच्च प्रदूषण स्तर के लिए भाजपा की आलोचना की, कहा कि उनकी सिगरेट से कोई फर्क नहीं पड़ेगा। भाजपा सांसद ठाकुर ने इस घटना की शिकायत की, संसद में ई-सिगरेट के खिलाफ नियमों का हवाला दिया।